पाचोरा बसस्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळच जिवघेणा खड्डा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०९/२०२२
पाचोरा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच भलामोठा खड्डा पडलेला असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून मोठे डबके तयार झाले आहे. या खड्डेयुक्त डबक्यामुळे पाचोरा बसस्थानकात एसटीत येणारे प्रवासी झोपेत असले तरी या खड्ड्यात बस गेल्यानंतर बसणारा जोरदार दणका (झटका) लागताच आपण पाचोरा शहरात पोहोचल्याची खात्री पटते तसेच पाचोरा बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या एसटीच्या प्रवाशांना या खड्ड्यांचा दणका खाल्ल्याशिवाय आपला परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे याची खात्री पटत नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
विशेष म्हणजे पाचोरा हे तालुक्याचे गाव असून पाचोरा बसस्थानक फक्त बसस्थानक नसून पाचोरा आगार आहे. याच पाचोरा शहरात दररोज तालुक्यातील शेकडो नागरीक दैनंदिन कामकाजासाठी व हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात तसेच आता प्रवासी रेल्वे वाहतूक नियमीत सुरु झाल्यामुळे मुंबई, नागपूर या शहरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास संपल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी एसटी हे एकमेव साधन आहे.
परंतु पाचोरा बसस्थानकात प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी, पंखे ह्या सुविधा पाहिजे तश्या चांगल्याप्रकारे उपलब्ध नसून बसस्थानकाच्या समोर भलामोठा खड्डा असल्याने नक्कीच प्रवाश्यांमधे नाराजी व्यक्त केली जात आहे. म्हणून हा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा व इतर सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.