अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०४/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे दररोज लहानमोठे अपघात होत असुन दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली असून या अपघातामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने बेशिस्त वाहतूक थांबवण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे आहे.
या अनुषंगाने अमळनेर पोलिसांकडून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाहन तपासणी मोहीम राबवली जात असून यात अल्पवयीन मुले, मुली वाहन चालवतांना आढळून आल्यास त्याला पायबंद घालण्यासाठी तसेच विना परवाना (लायसन्स) वाहन चालवणे, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करणे, वाहनाला फॅंन्शी नंबरप्लेट बसवणे, दुचाकीवरुन तीन सिट बसून भरधाव वेगाने गाडी पळवणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे, भरधाव वेगाने वाहन पळवणे अश्या वाहनांची तपासणी करुन संबंधित वाहनधारकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.
या मोहिमेमुळे नक्कीच वाहतूकीला शिस्त लागणार असून होणारे गैरप्रकार व अपघात कमी होतील असे दिसून येत आहे.