शिंदाड येथील फोटोग्राफर संदीप बोरसे यांना छाया भूषण पुरस्कार प्राप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२१
दिनांक २ मार्च मंगळवार रोजी नाशिक येथील कवी कालिदास कला मंदिर येथे अखिल भारतीय पत्रकार संघा तर्फे राष्ट्रीय गुण गौरव पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली. अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शासनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्स व मास परिधान करून उत्साहात संपन्न झाला त्याच प्रमाणे स्पर्श डिजिटल शिंदाड व पाचोरा यांचे संचालक *संदीप शांताराम बोरसे* यांना कोरोना काळात पाचोरा शहरातील सर्व परिसरांचा हेलिकॅम द्वारे चित्रफीत करून शासनास सहकार्य केले त्याबद्दल त्यांना अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे *छाया भूषण*” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार राष्ट्रीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महिंद्रजी देशपांडे, मिसेस इंडिया अभिनेत्री वृषाली तायडे, कवी राजन लाखे ज्येष्ठ संपादक विश्वासजी देवकर यांच्या हस्ते देण्यात आला तर उपस्थित मान्यवर खासदार भारती पवार माधुरी देशपांडे, संतोष शिंदे, वृत्तवाहिनी निवेदिका स्वाती महाळणक आदी मान्यवर उपस्थित होते.