आंबे वडगाव येथे आरओ. प्रणालीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०७/२०२१
जल ही जीवन है, असे म्हटले जाते पिण्याचे पाणी शुध्द नसेल तर आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. नेमके पावसाळ्यात पाण्यात अनेक बदल घडत असतात व ते आरोग्यासाठी घातक असतात. यातूनच डायरिया व इतर आजारांची लागण होऊ शकते.
ही बाब लक्षात घेऊन पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे ग्रामपंचायत तर्फे ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करत पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून नुकतीच आरओ प्रणाली बसवून या आरओ.प्रणालीचा लोकार्पण सोहळा प्रभारी सरपंच मा.श्री. मुकेश पाटील यांच्या उपस्थितीत अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाचे प.पु.प.म.आचार्य श्री, मोठे बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आला.
अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचे माध्यमातून निधी उपलब्ध करुन ही आरओ.प्रणाली बसवण्यात आली आहे. या ठिकाणी पाच रुपयाचे नाणे कॉइन बॉक्समध्ये टाकल्यास दहा लिटर व एक रुपयाचे नाणे टाकल्यास एक लिटर शुध्द पाणी मिळणार असल्याने गावातील ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थ व विशेष करून महिलांनी सरपंच, सदस्यांचे आभार मानले आहे.
या आरओ.प्रणालीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री.मोहन बाबा येळमकर, कायदेतज्ज्ञ मा.श्री. मंगेशराव गायकवाड, मा. श्री.तान्हाजी पाटील, मा.श्री.मिलिंद भुसारे, मा. श्री.विनायक पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.पितांबर कोळी,डॉ.श्री.शामकांत पाटील प्रभारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य श्री.ग्रा.प.सदस्य मंगतु राठोड ,ग्रा.प.सदस्य मा. श्री.हर्षल पाटील,ग्रा.प.सदस्य मा. श्री.बबलू तडवी ग्रा.प.सदस्य मा. श्री.चतरू चव्हाण,मा.श्री.सुनील निकम,सौ.सरला ताई निकम, मा. श्री.रविंद्र सोनवणे, मा. श्री.रवींद्र मराठे. मा. श्री.संगीत शिंदे,मा.श्री.मंगेश खैरणार,मा.श्री.उमेश शिंदे मा.श्री.बबलू तडवी मा. श्री.आधार देवरे,मा.श्री.सतिष निकम,मा.श्री.प्रदीप सानप.मा.श्री.अनिल शिंदे,मा.श्री.प्रमोद चव्हाण व असंख्य ग्रामस्थ हजर होते.