प्राजक्ता फिल्म प्रोडक्शन बॅनरखाली, दाटले धुके उद्या प्रेक्षकांच्या भेटीला.
योगिता तांबोळी.(प्रतिनिधी)
दिनांक~११/११/२०२१
दाटले धुके हा मराठी साँग अल्बम उद्या आपल्या समोर घेऊन येत असून पी.एफ.पी. म्युझिक वरती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर टिव्ही चैनल वरती प्रेक्षकांना दिसणार आहे.
या अल्बमची अभिनेत्री हर्षला बराडे व अभिनेता रोहित निकम या तरूण जोडीने या अल्बम मध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यामध्ये एक थी बेगम २ या तुफान यशस्वी वेबसिरीज मध्ये नुकतच काम केलेली हर्षला बराडे या अभिनेत्री सोबत सात जन्माच्या गाठी या यशस्वी मालिकेतील अभिनेता रोहित निकम या जोडीने दाटले धुके या अल्बममध्ये आपली अदाकारी सदर केली आहे.
या अल्बम आणि चित्रपटाला कैलास काशीनाथ पवार यांनी डायरेक्शन केले आहे. प्रोडूसर रेखा सुरेंद्र जगताप. कॅमेरामॅन बॉलिवूड चित्रपटाचे उत्कृष्ट रीतीने चित्रीकरण केलेले. अक्रम खान या अल्बमचे कॅमेरामॅन आहेत. कार्यकारी निर्माता संजय फडतरे. सहकलाकार तेजस बने, सुजित, तुषार भोईर, नीलिमातुषार, भाग्यलक्ष्मी कुलकर्णी बालकलाकार वेदिका कुलकर्णी, नंदनी, या अल्बम चे कोरिओग्राफर प्रमोद यांनी यशस्वी असं कोरेग्राफ केला आहे.
प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरांनी गाणी गायली असून त्यांना अनुराग गोडबोले यांनी आपल्या गोड आवाजामध्ये साथ दिली आहे. तसेच संगीतकार गीतकार सुनील म्हात्रे अविनाश पाटील यांनी सात सुरांची अभिनव साथ दिली आहे.
चला तर मग उद्या आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत एक सदाबहार लव्ह सॉंग पी.एफ.पी म्युझिक चॅनल वरती आणि टीव्ही चॅनल वरती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांना एकाचवेळी दिसणार आहे.