अमळनेर पोलिसांची दबंग कार्यवाही..तेरा लाखांचा गांजा जप्त…आरोपी अटकेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२१
जळगाव
अमळनेर पो.स्टे. हददीत दि.२८/०१/२०२१ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरुन त्यांनी मा. पोलीस अधीक्षक, जळगांव श्री. डॉ. प्रविण मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव श्री. सचिन गोरे, यांच्या सुचनाप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा श्री.राजेंद्र रायसिंग व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर श्री. राकेश जाधव यांच्या आदेशान्वये, पोलीस निरीक्षक
अंबादास मोरे यांनी पोलीस स्टेशनचे अंमलदार किशोर पाटील, दिपक विसावे, डॉ. शरद पाटील,दिपक माळी, रवि पाटील, हितेश चिंचोरे, भुषण बाविस्कर, आशिष गायकवाड, सुनिल पाटील, अरुण बागुल, मिलींद बोरसे आणि योगेश महाजन तसेच शासकीय पंच श्री. गणेश महाजन, श्री. जितेंद्र पाटील, फोटोग्राफर श्री. पंकज पाटील आणि वजनमापक श्री. विनोद वर्मा असे शासकीय वाहनाने धरणगांवकडील ढेकू रोडवर सापळ लावून धरणगांवकडून अमळनेर कडे येणारे वाहन क्र. एम.एच-१९ डी.सी.-२४७५ व एम.एच.-१९-डी.जे.-८७३० अशा टू व्हिलर वाहनाने ढेकू खु. गावातील श्री. दत्त मंदीरा समोर यशस्वीरित्या पकडले त्यातील आरोपी नामे राजू भावलाल पवार वय-३१ वर्षे, मनोज मदन पवार वय-३० वर्षे, दिनेश मेवालाल बेलदार वय-३७ वर्षे अशांना तीन गोण्यात ३५ खाकी रंगाच्या पाकीटे गांजा ताब्यात मिळून आला, गांजा एकूण ७५ किलो ७०० ग्राम बाजारभाव प्रमाणे किंमत
११,२५,०००/-(अकरा लाख, पंचवीस हजार, रुपये मात्र) व २ मोटर सायकल किंमत प्रत्येकी १ लाख प्रमाणे २ लाख रुपये असे एकूण मुददेमाल १३,२५,०००/- (तेरा लाख, पंचवीस हजार रुपये मात्र) किंमतीचा आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर अमळनेर पो.स्टे. गुरनं.५७/२०२१ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८, २०, २२ भा.द.वी. कलम ३४ प्रमाणे गुन्हा दि.२९/०१/२०२१ प्रमाणे दाखल
करण्यात आला आहे.