कुऱ्हाड बुद्रुक येथे दिव्यांग बांधवांना नियुक्ती पत्राचे वितरण सोहळा संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे श्रवणकुमार बहुउद्देशिय अपंग विकास संस्था,महाराष्ट्र राज्य अपंग विकास संघटना जळगाव व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना,नगरदेवळा यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांची जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती पत्राचे वितरण येशवंत सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख,दिव्यांग संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष नाशिक खांदेश महिला आघाडी प्रमुख , यशवंत सेना संस्थापक अध्यक्षा , सौ.संगिताताई पाटील,अध्यक्ष श्री. अनिल पाटील(नगरदेवळा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,राजमाता माता जिजाऊ , माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला
प्रसंगी जळगाव जिल्हा नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली यात सर्वानचमते अध्यक्ष आण्णा तानाजी पाटील (कुऱ्हाड), सचिव गोकुळ गवळी , सहसचिव उमेश पाटील , खजिनदार करणसिंग राठोड यांचा समावेश आहे.
या प्रसंगी उपाध्यक्ष सुनील माळदे , सचिव गोरख पाटील, सहसचिव शांताराम पाटील (पाचोरा),खजिनदार मनिषा पाटील(गाळण),तसेच माजी सरपंच किरण पाटील, संतोषदादा चौधरी, डॉ. देवेंद्र पाटील, पद्दमाताई पाटील, उमेश पाटील इतर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या हा कार्यक्रम कुऱ्हाड खुर्दचे संतोषदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला