दक्ष पत्रकार संघाचे राहुरीचे संपादक तसेच संस्थापक मा रोहिदास दातीर यांची हत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
वार बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी बारा वाजेच्या दरम्यान मल्हारवाडी रोड वरून घरी स्कुटी वरून जात असतांना एका स्कार्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण करून नंगट व्यक्तींकडून हत्या झाल्याचे समोर दिसून येत आहे.
राहुरी येथील दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक रोहिदास दातीर हे समाजातील दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध सतत कार्यरत गोरगरिबांसाठी धडपडणारी आणि अन्याय विरुद्ध आवाज उचलणारा अवलिया व्यक्तीमहत्त्व आज आपल्यातून निघून गेले अशा पाठीमागून भ्याड हल्ला करणाऱ्या निर्लज्ज या लोकांवर कडक कारवाई करून पोलीस प्रशासनाने पत्रकारावर होणारे हल्ले आणि आज जे हत्या करण्यात आली यांना कायमचा धडा शिकवायला हवा या प्रकरणातील संबंधित जे पण व्यक्ती असतील त्यांच्यावर भयंकर शिक्षा करण्यात यावी जेणे कुठल्याही पत्रकार बंधू-भगिनींना ज्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले गेले आहेत त्यांच्याकडे भविष्यात कोणीही नजर उचलून बघणार नाही.
आज कोरोनासारख्या महामारीत पत्रकार हे आपला जीव पणाला लावून समाजासाठी सत्य परिस्थीतीवर लिखाण करून
आज पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. समाजातील लोकांच्या अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे समाजापुढे मांडत असतो. अशातच असे प्रकार घडत असतील तर पत्रकारांनी कशा पद्धतीने काम करायचे ? हे हल्ले कधी थांबणार ? पत्रकार सुरक्षा कायदा फक्त देखावा आहे काय ? त्यात काही तथ्य आहे की नाही असे अनेक प्रश्न उभे राहतात.
अशा अतिशय क्रूर निंदनीय प्रवृत्तीविरुद्ध सरकारने धडाडीचे निर्णय घेऊन गुंड नंगट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध मोहीम राबवावी आणि अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करून आळा घालावा अशी मागणी होत आहे.
तसेच काही गुंडांना काही प्रमाणात राजाश्रय मिळत असतो तर काही भ्रष्ट कायद्याच्या रक्षक या गुडांना पाठीशी घालत असतात यातून असे प्रकार घडतात म्हणून दिवसेंदिवस गुंडागर्दी वाढत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त केल्या जात आहेत.
नम्र निवेदन = सर्व पत्रकार संघटनांनी आपल्याला संघटनेकडून तालुका व जिल्हास्तरावर निषेधार्थ निवेदन देऊन आरोपींना कडक शासन होण्याची मागणी करावी.
(सत्यजित न्यूज पाचोरा)