प्लॅॉटच्या परस्पर विक्रीप्रकरणी गुन्हा
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२१/११/२०२०
पाचोरा : बिनशेतीप्लॉटच्या उताऱ्यावर पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतांना संगनमताने प्लॉटची परस्पर विल्हेवाट
लावून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात ७
जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.लोहारा ता. पाचोरा येथील शरद सुपड्ड पाटील यांच्या मालकीचा लोहारा
शिवारातील बिनशेती गट. नंबर. ९३५/२ मधील प्लॉट नंबर ३५ क्षेत्र १२८.८५ चौरस मीटरच्या बखळ प्लॉटच्या उताऱ्यावर धीरजदेवी उत्तमलाल जयस्वाल ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोहारा या पतसंस्थेचा एक लाख पन्नास
हजाराचा बोजा असतांना सदर बोजा कमी करून बनावट दस्ताऐवज तयार करून प्लॉट मालक शरद पाटील यांनी
अंकलेश्वर प्रभाकर पालीवाल यांना दिनांक २८ ऑक्टोबर २०१५ रोजी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडे दस्ताऐवज
तयार करून खरेदी खत नोंदविले. सदर प्लॉटची परस्पर संगनमताने विल्हेवाट लावली. यावरून प्लॉटचे मालक शरद
सुपडू पाटील व घेणारा अंकलेश्वर प्रभाकर पालीवाल यांच्यासह
तात्कालीन तलाठी ,मंडळ अधिकारी,दस्त लेखक, खरेदीतील दस्ताचे साक्षीदार अशा सात जणांविरुद्ध संस्थेचे
चेअरमन अक्षय उत्तमलाल जैस्वाल यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
आहे.