कोजागिरी पौर्णिमा
गुगल वरुन सर्च
*कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व -*
*२३/१०/१८ मंगलवार*
“आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते” यास ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन
महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबर मध्ये असते.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे
आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते
असा समज आहे.ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात.दिवसा उपवास करून
रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या पूजेनंतर रात्री
चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम,चारोळ्या, वेलदोडे,जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत. दुधात
मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले
जाते.उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी
चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ
रात्री रस्ते,घरे, मंदिरे, उद्याने,घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत.
सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी
‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व ‘शरत्पौर्णिमा’ अशीही
नावे ह्या दिवसास आहेत.पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला
उत्सवाचे महत्त्व आले असावे.
या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे. काही लोक
तांब्याच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली सोन्याची
लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी
चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले १०० दिवे
लावतात. देवीला नैवैद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व
बर्याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण
खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर
मांगल्यमय गाणी म्हणून, भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी
सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरूजींना अर्पित
करावी. अशीही काही ठिकाणी पद्धत,परंपरा आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये
वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणार्याला प्रसन्न होते. जो
मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन-धान्य देईन, असे
ती म्हणते.
दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते.
त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकातही
सद्गती मिळते.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी
केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची
पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची
‘आश्विनी’ साजरी करतात.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा
म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी
पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी
नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी पौर्णिमेचे व्रत
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असते. या दिवशी
‘कोजागरी व्रत’ केले जाते.
या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे. श्रीमंत लोक
तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची
मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय
झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले 100 दिवे लावतात.
याशिवाय देवीला नैवैद्यही दाखविला जातो. तूप असलेली खीर तयार करावी व
बर्याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण
खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर
मांगल्यमय गाणी म्हणून, भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी
सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरूजींना अर्पित
करावी.
कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये
वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणार्याला प्रसन्न होते. जो
मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन-धान्य देईन, असे
ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी
केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर
परलोकातही सद्गती मिळते.
कोजागरी व्रताचे महत्त्व
आश्विन पौर्णिमेला ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची
पूजा करावी. उपवास करावा. गंधपुष्पादींनी पूजिलेले व तुपाचे एक लक्ष,
पन्नास हजार, दहा हजार, एक हजार किंवा शंभर दीप लावून देवमंदिर,
बाग-उद्याने, तुसलीवृंदावन अश्वत्थवृक्ष, वस्तीतील रस्ते, चौक, गल्ला,
घराची छते इ. ठिकाणी ठेवावे.
उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी. ब्राह्मनांना घृतशर्करामिश्रित
खीर वाढावी. वस्त्रे, दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीप दान करावे. असे
केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते. या दिवशी रात्री इंद्र आणि लक्ष्मी
विचारीत असतात, ‘ कोण जागे आहे’? उत्तरादाखल त्यांचे पूजन आण दीपप्रज्वलन
पाहिले म्हणजे त्या देवता प्रसन्न होतात आण हे व्रत करणारास लक्ष्मी आणि
प्रभुत्व प्राप्त होते.
कोजागिरी पौर्णिमेला पुढील विधीनुसार पूजा केल्यास प्रसन्न होते महालक्ष्मी
धर्म शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर
भ्रमण करून, को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या
व्यक्तीचे कल्याण करते. या कारणामुळे या व्रताचे नाव कोजागिरी पौर्णिमा
असे पडले.
धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार –
निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी।
जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।
पूजन विधी
या व्रतामध्ये हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास
ठेवावा. रात्रीच्या वेळी तुपाचे १०१ किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून
देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावावेत. सकाळी स्नान
करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप-साखर मिश्रित खीर व
मिष्टान्न भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण
होतात.
या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्रचे पाठ करावेत. अशा पद्धतीने
कोजागिरी पौर्णिमा व्रत केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख
प्रदान करते.
कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण
राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती.
ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात
ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला
धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला
चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना
ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.
जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती.नाग कन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार
धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीच ीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
कोजागिरी पौर्णिमेला करण्यात येणारे उपाय:
१. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून खाली दिलेल्या
महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने १०८ वेळेस जप करा
मंत्र
– ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ
महालक्ष्मयै नम:
या उपायाने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.
२. महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा
केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय
केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावी. खीर
घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी. नैवेद्य
दाखवल्यानंतर थोड्यावेळाने खीर प्रसाद स्वरुपात ग्रहण करावी. या उपायाने
तुम्हाला मानसिक शांतात मिळेल तसेच आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल.
३. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या
योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे
सूर्य प्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याचप्रकारे या
पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे
काहीकाळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. या उपायाने त्वचा उजळते
आणि मनाला शांती मिळते.
४. डोळ्यांसाठी लाभदायक:
जर तुमची डोळ्यांची शक्ती कमी झाली असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री
थोडावेळ चंद्राकडे पाहा. या उपायाने तुमच्या डोळ्यांची शक्ती वाढेल.
५. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी(चार वातींचा) दिवा
लावावा. दिव्यामध्ये चारही वाती चार दिशांकडे असतील अशाप्रकारे दिवा
लावावा. दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ करावेत. हनुमान चालीसा
माहिती नसल्यास ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप करावा.
अशीही शरद पोर्णिमा सर्वांनी साजरी करूयात.