महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाईल गेला चोरीला
कुडाळ
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्याची द्वितीय वर्षीय विज्ञान आयटी शाखेची विद्यार्थिनी इविशा डिसोजा (रा.दाभोली, वेंगुर्ले) हिची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यामधील रोख रक्कम, मोबाईलसह ६ हजार २५० रूपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे ही घटना (गुरुवारी) सकाळी ११ वाजण्याच्या घडली. अज्ञात इसमाने महाविद्यालयात प्रवेश कसा केला याबाबत मात्र चर्चा सुरू आहे.
यातील विद्यार्थीनी इविशा डिसोजा ही गुरुवारी सकाळी ८.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे आली होती यानंतर तिने कॉलेजची बॅग कॉलेजच्या प्रॅक्टिकल वर्गाच्या बाहेर रॅकवर ठेवून ती प्रॅक्टिकल रूम मध्ये गेली होती यानंतर सकाळी ११ वाजता प्रॅक्टिकल संपल्यानंतर वर्गाच्या बाहेर आल्यावर तिने ठेवलेल्या ठिकाणी तिला आपली बॅग आढळली नाही. यानंतर तिने आपल्या मैत्रिणींकडे याबाबत चौकशी केली, वर्गात जाऊन परत खात्री केली. यानंतर महाविद्यालयातील शिक्षकांना याबाबत कल्पना दिली. यानंतर महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता २५ ते ३० वर्षाचा एक अज्ञात इसम कॉलेजच्या जिन्यावर व तिथे उभा असलेला दिसला त्यानंतर काही वेळाने त्यांने रॅकवर केलेल्या बॅग पैकी इविशा डिसोजा हिची बॅग उचलून घेऊन महाविद्यालयाच्या बाहेर जाताना दिसला. या सॅगमध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, १ हजार १०० रू. रोख रक्कम व चार वह्या असा सुमारे ६ हजार २५० रू.चा मुद्देमाल आहे. स्वतःच्या फायद्यासाठी सॅग व आतील मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद इविशा विल्सन डिसोजा यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पो हे कॉ.मंगेश जाधव हे करत आहेत अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली .