कुडाळ नगरपंचायतीने सुरू केली जप्तीची कारवाई

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतमध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर अडकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर कुडाळ नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या कर विभागाकडून 10 हजाराहून अधिकच कर चूकविणाऱ्या 200 मालमत्ता धारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी कर न भरल्यास मालमत्ता जप्त करणार असल्याच्या आशयाच्या नोटीसा संबंधित चक्रवाकीदारांना देण्यात आल्या होत्या. थकीत मालमत्ता सील करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने जप्ती पथक तयार करण्यात आल्या आहेत.

आज शुक्रवार दि. 10/02/2023 रोजी कुडाळ शहरातील परशुरत्न कॉम्प्लेक्स, कुडाळेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स व सिद्धिविनायक अपार्टमेंट मधील वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या सहा मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक व जप्ती पथक प्रमुख सहा कर निरीक्षक श्रीमती रचना कोरगांवकर, लिपिक श्री. दत्ताराम म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी श्री. शैलेश नेवाळकर, केतन पवार, मंदार सावत, रोहित परब, सतोश जाधव प्रवीण कोरगावकर यांच्या पथकाने केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून मालमत्ता व पाणीपाड़ी कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांकडे जाऊन तो कर भरून घेण्यासाठी वसुली पथक तयार असून हे फिरते पथक चकबाकीदारापर्यंत पोहचून त्यांच्याकडून कर वसुली करून घेत आहेत. कुडाळ नगरपंचायतीमार्फत कर जमा करण्यासाठी नगरपंचातीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ता कर व पाणी पट्टी कर थकबाकी ठेवलेल्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिर करण्यात येणार आहेत, त्यामुळे वेळेत थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या कर विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकातून  करण्यात आलेले आहे.