पाचोरा शिवसेनेतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात कमी करणेबाबत तहसिलदार यांना दिले निवेदन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२०
सरकारने वारंवार पेट्रोल-डिझेल दरवाढ करत असल्या कारणाने दळवळणाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे.त्यामुळे जनतेत कंबरडे मोडले गेले.प्रवासाचा खर्च वाढला, जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले,त्यामुळे महागाई च्या कचाट्यात सामान्य नागरिक होरपळुन निघत आहे.कोरोनाच्या महाभयंकर आजारातुन अद्यापपर्यंत जनता जनार्दन सावरले नाहीत.उद्योगधंदे असुन सुरू नाहीत कसं जगावं संसार कसा चालवावा असा प्रश्र्न जनतेसमोर उभा आहे.त्यात भरीस भर म्हणुन केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल चे भाव वाढवुन जनतेची गळचेपी करीत आहे.म्हणुन केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल दरवाढी मागे घ्यावी अन्यथा पाचोरा तालुका शिवसेना व युवासेना महिला आघाडी वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा भावना कळवुन तीव्र इशारा लेखी निवेदनाद्वारे -शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर युवानेते सुमित पाटील, जि.प सदस्य रावसाहेब पाटील,पदमबापु पाटील, ज्ञानेश्वर चौधरी जावेद शेख संदिप पाटील सौरभ चेडे, महिला आघाडी चे पदाधिकारी सुषमाताई पाटील,मंदाताई पाटील,उर्मिलाताई शेळके,किरणताई पाटील,स्मिताताई बारवकर,मिनाताई पाटील,कल्पनाताई पाटील,अरूणा पिंगळे,रंजनाताई पाटील,सुनंदाताई पाटील,प्रिती सोनवणे,जया सुरवडकर,गिताताई मोरे,आशाताई दांडगे,बापु हटकर,दादाभाऊ चौधरी,मयुर महाजन,संतोष हटकर,अण्णा चौधरी,पवन पाटील,सागर पाटील,पप्पु जाधव,सुधाकार महाजन, जितेंद्र पेंढारकर,बंडु चौधरी,गजु पाटील,मोहन राजपुत ,अॅड.राजु परदेशी,गणेश देशमुख,छोटु चौधरी, नितीन पाटील,विजय भोई उपस्थित होते.