पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात हरणाची शिकार, वनमजूरासह कायद्याचा रक्षक सहभागी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२२
(पाचोरा व जामनेर वनविभागातील राखीव जंगलात दिवसाढवळ्या रानडुक्कर, निल गाय व हरणाची शिकार जनतेतून संतप्त प्रतिक्रिया)
आजच्या परिस्थितीत सगळीकडेच कायद्याचा वचक राहिलेला नाही असा अनुभव पदोपदी येत असून यात वनविभागातील कारभार सुध्दा मन राजा, मन प्रधान असा सुरु आहे. यात जामनेर व पाचोरा तालुक्यातील वनविभागाने आघाडी घेतली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण कालच्या दिवशी म्हणजे दिनांक १९ जून २०२२ रविवार रोजी कळमसरा राखीव जंगलात गोरबल्डी भागात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे सत्य जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज ने सहजच कळमसरा, लोहार, पाळधी, पहूर, कुऱ्हाड परिसरातून व जंगलातून फेरफटका मारला असता यात गावातील नाही परंतु जंगलातील काही गुराख्यांनी पोट तिडके सत्य परिस्थिती कथन केली.
यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा व जामनेर राखीव जंगलामध्ये निलगाय (रोही), रानडुक्कर व ससे यांची शिकार तर होतच आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून हरणाची शिकार करण्यासाठी एक टोळी सक्रिय झाली असून या टोळीमध्ये चक्क पाचोरा तालुक्यातील वनविभागात कामावर असलेल्या एका वनमजूरासह पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही गालठी दारु निर्मिती व विक्री करणारांचा समावेश असून हि टोळी म्हणजे (शिकारी) वाघूरचा (दोऱ्यांचे जाळ्याचा) वापर करून हरणांची शिकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या टोळीतील पाचोरा तालुक्यातील एका गावातील गावठी दारुचा व्यवसाय करणारांच्या दारु निर्मीतीच्या भट्ट्या पाचोरा व जामनेर तालुक्यातील दारु राखीव जंगलात तसेच जंगलाच्या आसपासच्या जलसाठ्यांजवळ आहेत. तसेच आता मागिल तीन महिन्यांपासून कडकडीत उन्हाळ्यात जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी मुबलक जलसाठे किंवा वनविभागाकडून पाणवठे उपलब्ध नसल्याने हे जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी गावालगतच्या जलसाठ्याजवळ येतात याचाच फायदा घेत या पाणवठ्यावर वाघुर (जाळे) लावून हरणांची शिकार केली जात आहे.
विशेष म्हणजे शिकार करणे सोपे होण्यासाठी रानडुक्कर, निलगायी व हरणांचा कळप आज कुठे व कोणत्या जंगलात आहे, किती संख्या आहे याची रेखी करुन शिकाऱ्यांना माहिती पुरवण्याचे काम जामनेर तालुक्यातील एक वनमजूर इमानेइतबारे करतो व तोही शिकार करतांना या शिकाऱ्यांच्या टोळीत सहभागी असतो तसेच हरणाची शिकार यशस्वी झाल्यावर याचे बिंग फुटू नये म्हणून या शिकार झालेल्या हरणाचे मास एका डब्यात भरून (एका कायद्याच्या रक्षकाच्या) घरी न चुकता नेऊन दिले जाते तसेच शिकार केलेल्या हरणाची कातडी खोल खड्डा करुन बुजवून टाकतात किंवा जाळुन टाकत टाकतात अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही जंगलातील परंतु (विचारांनी) सुज्ञ असलेल्या नागरिकांनी दिली असून या हरणाच्या झालेल्या शिकारीचा तपास करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी व यापुढे कोणत्याही जंगली प्राण्यांची शिकार होणार नाही याकरिता वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्राणी व पशुप्रेमींनकडू केली जात आहे.
(येतो झाकी अभि बहोत कुछ बाकी है,)