सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चलती, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बंद करण्यात येते बोलती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२०
महाराष्ट्रात सी.सी.आय.तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सी.सी.आयची कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यामागचा शासनाचा हेतु हाच की कष्टकरी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कापूस खरेदी सुरु करण्यात आली.
मात्र या कापूस खरेदी केंद्रापैकी काही केंद्रावर ग्रेडर व व्यापाऱ्यांची मिलीभगत झाल्याने बाजार समीतीत नाव नोंदणीपासून तर टोकण मिळवणे, प्रतवारी ठरवतांना व्यापाऱ्यांना झुकते माप देणे, वजनकाटा करतांना मर्जीप्रमाणे कट्टी लावणे यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
याबाबत काही शेतकऱ्यांनी दिलेली माहिती खूपच विचार करायला लावणारी असून आपला हा देश खरच शेतीप्रधान आहे की दलालांचा हा प्रश्न उभा रहातो.
या बाबतीत सत्यजीत न्यूज पुराव्यानिशी लवकरच पांढऱ्या कापसाच्या बाजारात सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर व्यापारी, ग्रेडर, दलालांच्या चाललेल्या काळ्या धंद्याचा भांडाफोड करणार आहे.
तरी शेतकरी बांधवांनी सत्यजित न्यूजला संपर्क करुन आपले अनुभव सांगितले आहेत व अजूनही कुणाला काही अडचणी असतील तर नक्की सांगा आम्ही नक्कीच आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू
भ्रमणध्वनी ~ ९९७५६६६५२१/७७१९०३४५२१
(बैलगाड्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकरी संतप्त सविस्तर वाचा उद्या)