भोरटेक येथे घराला आग लागून संसारउपयोगी वस्तू जळून खाक. रावसाहेब पाटील यांच्याकडून आर्थिक मदत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१०/२०२१
नगरदेवळा येथून जवळच असलेल्या भोरटेक खुर्द येथील गोपीचंद चांभार या शेतमजूर कुटुंबाचे घर आगीत जळून खाक झाले असून त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नसून एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
भोरटेक येथील गोपीचंद महादू चांभार हे भूमिहीन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नीसह मुले बाहेरगावी गेले होते. व ते मजुरी साठी बाहेर गेले असता दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावला होता. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागुन असून घरातील संसारउपयोगी वस्तू, रोख रक्कम, अन्नधान्य, शालेयउपयोगी कागदपत्रे व अन्य वस्तू या आगीत जळून खाक झाल्या आहेत.
ऐन सणासुदीला देवापुढे लावलेल्या दिल्यामुळे घराला आग लागल्याने मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब अगदी रस्त्यावर आले आहे. ही घटना घडल्यानंतर सरपंच यांनी त्वरित तलाठी यांना संपर्क करून घडलेली घटना सांगितली तलाठी आप्पा यांनी त्वरीत घटनास्थळी येऊन आग लागलेल्या घराचा पंचनामा केला आहे.
या घटनेची माहिती मीळताच जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी काल रोजी पिडीत कुटुंबाची भेट देऊन पाहणी केली व कुटुंबप्रमुख गोपीचंद चांभार यांस पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन कुटुंबाला एकप्रकारे आधार दिला आहे. तसेच याविषयी आमदार किशोर आप्पा पाटील, तहसीलदार कैलास चावडे यांना कॉल करून माहिती दिली व शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी असे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी अर्थसाहाय्य करून केले याबद्दल गोपीचंद चांभार यांनी आभार मानले याप्रसंगी त्यांच्यासोबत सरपंच गुलाब चांभार, उपसरपंच श्रावण पाटील, दिपक पाटील, ग्रामसेवक समाधान पवार, भारत पाटील, गोकुळ पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.