ग्रामविकास मंडळाच्या निवडणुकीत ग्राम विकास मंडळ बचाव पॅनलचा नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२२

(बातमी बघतांना व्हिडिओ व पोर्टल न्यूजची लींक सबस्क्राईब करा व बघा कोण जिंकणार ते.)

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास मंडळाची त्रिवार्षीक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत ग्रामविकास मंडळ बचाव पॅनल व विकास पॅनलची समोरासमोर लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत असून या निवडणुकीसाठी दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी कै. हरीभाऊ गोविंदराव देशपांडे सभागृह ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्र्वर येथे सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

या निवडणुकीत ग्रामविकास मंडळ बचाव पॅनल हे सुर्य निशानीवर निवडणूक लढवणार असून आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी श्री. गोविंद महाराज मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उमेदवारांसह, मतदार व हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थीती दिसून आली.

ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्र्वर मंडळाची निवडणूक मागील तीन वर्षापुर्वीच घेणे क्रमप्राप्त होते. मात्र मध्यंतरी कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे तसेच सत्ताधारी गटाचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे ही निवडणूक तब्बल सहा वर्षांनंतर घेण्यात येत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची व महत्वपूर्ण ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी प्रकाश बाजीराव पाटील, चिटणीस पदासाठी सुकदेव विठ्ठल गिते, आश्रयदाते पदासाठी भास्कर धनजी पाटील, मागासवर्गीय अनुसूचित जाती पदासाठी दिपक हरसिंग सोनवणे, भटक्या विमुक्त जाती, जमाती पदासाठी भाईदास त्र्यंबक चव्हाण, महीला राखीव पदासाठी गयाबाई जगदेव मालकर हे उभे असून प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार आहे.

तर हितचिंतक पदासाठी भैय्या विलास मधुकरराव गरुड, दिलीप फुलचंद जैन. (दिलीप शेठ), कडूबा बालचंद तेली, जनार्दन ओंकार देव, हंसराज गोबरु चव्हाण, अशोक दत्तू पाटील, प्रदिप रघुनाथ बडगुजर, सुरेश काशिनाथ बडगुजर, सलीमखॉ अलियारखॉ असे उमेदवार असून प्रत्येकाला नवू मते देण्याचा अधिकार आहे.

ग्राम विकास मंडळ बचाव पॅनल, पिंपळगाव हरेश्र्वर यांनी जाहीरनामा काढला असून यात संस्थेच्या घटनेप्रमाणे त्रैवार्षीक निवडणूक नियोजित वेळेवर घेऊ, शासनाच्या नियमानुसार/परिपत्रकानुसार आणि माध्यमिक शाळा संहिता १९८१ अधिन्वये संस्थेचे कामकाज करु, संस्थेचा आर्थिक व्यवहार पारदर्शक स्वरुपात व सर्व कार्यकारी सदस्यांना विश्वासात घेऊन करु, मुख्याध्यापक यांचे शालेय प्रशासनात मंडळ अनावश्यक ढवळाढवळ करणार नाही, संस्थेची मासिक, त्रैमासिक, वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या घटनेच्या नियमानुसार घेण्यात येतील, संस्थेच्या विविध शाखांना मिळणारे अनुदान तसेच संस्थेला मिळणारे निधी / देणग्या संस्थेच्या हितासाठी खर्च करण्यात येतील, संस्थेच्या विविध शाखांच्या रिक्त झालेल्या किंवा वाढीव जागेवर नियुककत्या या माध्यमिक शाळा संहिता अधिनीयम १९८१ नुसार गुणवत्तेच्या आधारे केल्या जातील, विद्यार्थी केंद्र बिंदू मानून विद्यार्थांची गुणवत्ता आणि सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहू, वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या (भोजनाच्या) गुणवत्तेकडे लक्ष देऊ, आश्रमशाळेतील मुलांसाठी शासन मान्य ज्या सोई सुविधा आहेत त्या शासनाकडून मिळऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करु, विद्यार्थ्यांना बौध्दिक, क्रीडा व इत्तर शालेय परिक्षांना प्रोत्साहीत करून नियोजन करण्यात येईल, विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिपच्या परिक्षांना बसविण्या साठी उत्तेजन देण्यात येईल, आम्ही सर्व उमेदवारांना काणत्या ही भरती झालेल्या शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यावर अन्याय करायचा नाही असे आश्वासन देऊन आम्ही सर्व ग्राम विकास मंडळ बचाव पॅनलचे उमेदवार सर्व मतदार बंधुना विनंती करतो की आम्ही सर्व उमीदवारांना फक्त आणि फक्त तीन वर्षा साठीच सेवची संधी द्यावी ही नम्र विनंती व आवाहन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या