गरज नसतांना घरा बाहेर निघू नका , स्वताः सह इतराची काळजी घ्या , उल्लंघन केल्यास कठोर पोलिस कारवाई.(पो.नि. प्रतापराव इंगळे.)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२१
गरज नसतांना घरा बाहेर विनाकारण बाहेर निघू नका , स्वता सह इतरांची काळजी घ्या, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर पोलिस कारवाई करण्यात येईल असा इशारा जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी दिला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात दिनांक २८ मार्च रविवार ते ३० मार्च मंगळवार पर्यंत कडक लॉक डाऊन चे आदेश सुचना आलेल्या आहे , कोरोना या महा भयंकर आजाराने सर्वदूर हातपाय पसरले असुन प्रत्येकाने स्वताः सह आपल्या परिवाराची , इतराची काळजी घ्या , शासणाने दिलेले आदेश सुचना सर्वांनी च पाळावे .
जो कोणी आदेश सुचना उल्लघंन करेल त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरु केली आहे.
याची सर्वांनी नोंद घ्यावी शहरात जागो जागी पोलिस कर्मचारी तैनात केलेले आहेत .
कारण नसताना बाहेर पडू नका व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री प्रताप इंगळे यांनी पत्रकारांशी केले आहे .