पेट्रोल डिझेल ची अवास्तव दरवाढ, हेच का अच्छे दिन.??- सुमित किशोर पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२१
केंद्र सरकारने केलेल्या वारेमाप इंधन दरवाढ विरोधात युवासेनेने मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव वरुण जी सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी शहर जिल्हा, लोकसभा, विधानसभा पातळीवर सायकल रॅली काढून आंदोलन केले.
याच आंदोलनाचा भाग म्हणून पाचोरा युवासेनेचे सुमित किशोर यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेलच्या भाव वाढीस जबाबदार असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला या सायकल रॅलीमध्ये असंख्य युवासेना कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पेट्रोल व डिझेलच्या भाववाढ झाल्यापासून खाजगी व एसटीची भाडेवाढ झाली आहे. ही भाडेवाढ नेमकी दिवाळीच्या सणासुदीला झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना लेकी, सुनांना दिपावळीच्या व भाऊबीजेच्या सणासुदीला माहेरी येणे जाणे आवाक्याबाहेर झाले आहे. तसेच शेत शिवारात कायमस्वरूपी विद्यूतपूरवठा होत नसून मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जाते तसेच जो काही विद्यूतपूरवठा केला जातो तो रात्री बे रात्री केला जात असल्याने हिरवळीच्या ठिकाणी विषारी किटकांचा धोका असतो म्हणून बरेचसे शेतकरी डिझेल मशिन वापरुन आपल्या पिकाला वेळेवर पाणी भरुन ते वाचवण्यासाठी धडपडत असतात त्यांनाही या डिझेल भाववाढीचा मोठ्या प्रमाणात भार सहन करावा लागत असल्याची खंत युवासेनेचे सुमित पाटील यांनी व्यक्त केली.
या केंद्र सरकारच्या विरोधातील निषेध रॅलीत आप्पा पाटील, आदित्य बिल्दीकर, संदीपराजे पाटील युवासेना शहरप्रमुख, सागर पाटील, योगेश पाथरवट,समाधान पाटील, मोरया गोहिल, अक्षय जैन, मयूर महाजन,राहुल पाटील,जितेंद्र पाटील, तात्या चौधरी, मोहसीन, शहारुख देशमुख, चेतन पाटील, पिंटू शिंदे, सागर सोनार, आकाश पाटील, जुबेर बागवान, अन्नूभाई, लकी, पियुष पाटील, शुभम पाटील, भैय्या जगताप, आशिष शिंपी,माया, गोपाल भोई, राज अमृतकर,जयंत पाटील, सोबत युवतीसेनेच्या डॉ.प्रियंकाताई किशोरअप्पा पाटील (युवतीसेना जिल्हा विस्तारक), प्रियंका गंगाराम पाटील, उर्मिलाताई शेळके,अनुष्का बिल्दीकर, सुषमाताई पाटील,सीमाताई पाटील, किरणताई पाटील, शोभाताई पाटील, मयुरी पाटील, पूजा पाटील, सीमाताई पवार, शिवसेना-युवासेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही सायकल रॅली पाचोरा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून, देशमुखवाडी, हुसेनी चौक,मच्ची बाजार,बाहेरपुरा, गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत,सायकल रॅली या परिसरातून काढून केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला.