गावाचे ऋण फेडण्यासाठी गजानन पाटील यांनी महादेवाचे मंदिराला दिली लाखाची देणगी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२०
मन्यूष्य कितीही मोठा व श्रीमंत झाला तरीदेखील मायभूमी, जन्मभूमी कधीच विसरू शकत नाही. आपण या समाजाचे या गावाचे काही देणे लागतो अशी भावना निर्माण होते. व गावासाठी काहीतरी करावे असे वाटते.
असाच अनुभव म्हसास या गावी नुकताच आला. पाचोरा तालुक्यातील म्हसास गावातील रहिवासी एक तरुण गजानन अशोक पाटील हे नोकरीनिमित्ताने बाहेरगावी रहातात ते ओलम इंटरनॅशनल कंपनीचे जनरल मॅनेजर म्हणून साऊथ आफ्रिकेमध्ये या कंपनीचे काम पाहतात ते नुकतेच गावाकडे आले होते.
म्हसास गावात अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन महादेव मंदिर आहे. गावकऱ्यांनी नुकताच या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले व तसे बांधकाम सुरू केले आहे.
मंदिर चांगले बांधले जावे ही सर्व ग्रामस्थांची इच्छा या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम गजानन पाटील यांनी पाहीले व मंदिरासाठी सर्वांहून पुढे येऊन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख स्वरुपात देणगी दिली.
या प्रसंगी अशोक पाटील, नाना पाटील, ईश्वर पाटील, संदिप गायकवाड, विश्वनाथ पाटील, भगवान पाटील, वाल्मीक पवार, विजय पाटील, रामकृष्ण पाटील, रामदास पाटील, प्रल्हाद कोळी, संदिप कोळी, अरुण पाटील, कडुबा पाटील, पुंडलिक पाटील, अमृत पाटील, पंढरी पाटील, विक्रम पाटील, अर्जून पाटील, भगवान पाटील, आनंद पाटील व ग्रामस्थांनी गजानन पाटील यांचे आभार मानले.