दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे डॉ. सौ. सपना बोथरा सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२४
माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ संचलित मा. दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे पाचोरा येथील समाजसेविका वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या डॉ. सौ. सपना रोहित बोथरा यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी एका अल्पसंख्याक समाजाच्या महिलेच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल पाचोरा, भडगाव तालुक्यातील सकल राजस्थानी जैन समाज आपला ऋणी आहे अशी प्रतिक्रिया राजस्थानी समाजातर्फे देण्यात आली आहे.
मी समाजाचे काहीतरी देणे लागते ही भावना मनात बाळगून मी आजपर्यंत मला शक्य होईल तेवढी समाजाभिमुख कामे करत आली आहे. या कामाची दखल घेऊन मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी मला सन्मानित केले याबद्दल मी सदैव त्यांची ऋणी आहे. विशेष म्हणजे हा सन्मान माझा एकटीचा नसून समाजबांधवांनी मला वेळोवेळी साथ देऊन प्रोत्साहित केले म्हणून मी सकल राजस्थानी समाजाची ऋणी असून या सन्मानाने माझ्यात आजून नवचैतन्य निर्माण झाल्याने मी अजून जास्त उत्साहाने समाजाभिमुख काम करेल असे मत डॉ. सौ. सपना बोथरा यांनी व्यक्त केले.