भारतीय जैन संघटनेतर्फे ३१ डिसेंबर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा, फुटपाथवरील असाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर, टोपी व खाऊचे वाटप.
ललित जैन.(चोपडा)
दिनांक~०२/०१/२०२३
चोपडा येथील भारतीय जैन संघटनातर्फे एक आव्हान सोशल मीडियावर करण्यात आले होते. की आपण ३१ डिसेंबर साजरे करतांना स्वतासाठी बडेजाव न करता म्हणजेच केक, फटाक्यांची आतषबाजी, नाचने, गाणे, वाद्य, रोषणाई यावर खर्च न करता आपण समाजाचे काही देणे लागतो जन सेवा हीच ईश्वर सेवा ही भावना मनात बाळगून ऊन, वारा, पावसात अर्धपोटी, उपवासी, फाटक्या कपड्यात जीवन जगणाऱ्या रस्त्याच्या कडेला म्हणजेच फुटपाथवर असलेल्या निराधारांना मदतीचा हात देऊन त्यांचेही नववर्ष आनंदमय कसे होईल याकरिता चोपडा शहर वासियांना मदतीची हाक दिली होती.
या हाकेला प्रतिसाद देत शेकडो दात्यांनी फुल नव्हे तर फुलाच्या पाकळीच्या स्वरुपात मदतीचा हात पुढे केला होता. याच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून आगळावेगळा उपक्रम हाती घेत या उपक्रमाअंतर्गत ३१ डिसेंबर २०२२ शनिवारी रोजी चोपडा शहरातील यावल रोड, ओम शांती कार्यालयाजवळील झोपडपट्टी, धनवाडी तसेच तांडा वस्तीवरील रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर रहात असलेल्या असाह्य अशा दोन वर्षे वयापासून तर अठरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना स्वेटर, टोपी व मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. हे वाटप सुरु असतांना असाह्य बेसाहारा बालकांना झालेला आनंद व त्यांच्या मनात उफाळून आलेल्या आनंद व त्यांचा आनंद व ऋण व्यक्त करणाऱ्या भावना पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले होते.
या गोरगरीबांना नविन वर्षाची ही आनंददायी भेट देण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. निर्मल बोरा, मा. श्री. सचिव गौरव कोचर, कोषाध्यक्ष मा. श्री. अभय ब्रम्हेंचा, मा. श्री. शुभम राखेचा, मा. श्री. दिनेश लोढाया, मा. श्री. लतीश जैन, (पत्रकार), मा. श्री. आदेश बरडीया, मा. श्री. आनंद आचलिया, मा. श्री. श्रेणिक रूणवाल, मा. श्री. आकाश जैन, मा. श्री. रोहन राखेचा, मा. श्री. आदींनी मेहनत घेतली.