मुलुख मैदान तोफ शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे दिनांक ०२ नोव्हेंबर बुधवार रोजी पाचोरा शहरात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२२
पाचोरा भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिक बांधवांनो, उठा, जागे व्हा आणि महाप्रबोधन यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. ही महाप्रबोधन यात्रा कशासाठी ? या यात्रेचा उद्देश एकच आहे की, या देशात लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत राज्यघटनेच्या चौकटीला खिळखिळी करणारी विचारधारा गतिमान होताना दिसत आहे. काही सत्तापिपासू वृत्ती केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी असत्याचा व अधर्माचा तांडव करीत आहेत. लोकशाहीची ज्योत मालवण्यासाठी ते सगळे हातात हात घालून रिंगण धरत आहेत. या तांडवात खुद्दारीला गद्दारीन गिळंकृत केलय. सत्याला असत्यानं येठीस धरल आहे. सत्तेच्या हावरट अभिलाषेमुळे कृतघ्नतेचा स्वैराचार वाढला आहे. त्यामुळे राजकीय नैतिकता हद्दपार होत आहे. कोणी विरोधात बोललं तर देशद्रोही म्हणून लेबल लावलं जातं. सत्याच्या पाठी तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून शुक्लकाष्ठ लावलं जातं. यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ होत आहे. ‘हम करे सो कायदा याप्रमाणे मनमानी कारभार सुरु आहे. आता राजकारणात आदराच्या ठिकाणी अनादार आला, वैचारिक मतभेदा ऐवजी त्याठिकाणी जानी दुश्मन ही भावना वाढीला लागली. विश्वासघात करून महाराष्ट्रात जे सत्तारोहण झालं, पुरोगामी महाराष्ट्राच्या राजसत्तेला जी काजळी लागली या अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारी ही महाप्रबोधन यात्रा आहे.
ज्यांनी बाळासाहेबांचे सुपुत्र मा. उध्दवजींना पायउतार करुन तमाम शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणलं त्या बंडखोरांचा खरपूस समाचार घेण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचा प्राण असलेल्या शिवसेनेवरच हल्ला करुन कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दृष्टांवर प्रहार करण्यासाठी,
ठाकरे परिवाराला संपवण्याच्या फाजील वल्गना करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना धडा शिकविण्यासाठी, खरे शिवसैनिक कोण हे दाखविण्यासाठी आणि गद्दारांचा नकाब उतरविण्यासाठी, राजकीय नैतिकतेला तिलांजली देऊन ज्यांनी कमळाच्या चिखलात लोळून आपली वैचारिकता सिध्द केली त्या बंडखोरांचा बुडबुडा फोडण्यासाठी महाप्रबोधन यात्रेनिमित्त पाचोरा शहरात दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी पाचोरा शहरातील मानसिंगका ग्राउंडवर रणरागिणी, मुलुख मैदान तोफ मा. प्रा. सुषमाताई अंधारे येणार आहेत. तरी पाचोरा, भडगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमी शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मा. सुषमाताईंचे विचार ऐकावे अशी विनंती शिवसेनेचे पाचोरा, भडगाव तालुक्याचे संपर्क प्रमुख मा. श्री. सुनील पाटील व स्वागतोत्सुक सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले आहे.