पाचोरा येथे धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२२

पाचोरा येथील रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार रोजी पहाटे मृतदेह आढळून आल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खांब क्रमांक ३७१/२८/३० दरम्यान अप रेल्वे लाईनवर आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास कोणत्यातरी प्रवासी रेल्वे खाली सापडून अंदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

या मयत अनोळखी इसमाची उंची ०५ फुट ०६ इंच, रंग काळा, सावळा, डोक्याचे केस काळे, उजव्या हाताच्या दंडावर दिल आकाराचे स्टॅचु केच तसेच अंगात निळ्या, हिरव्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे.

ही माहिती मिळताच शवरुग्णवाहिका चालक अमोल पाटील, बबलू मराठे, किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल करण्यात आला आहे. या मयत इसमाच्या वर्णनावरून किंवा या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास ९०२७१५२९६७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ए. पी. आय. किसन राख यांनी केले असून पुढील तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या