पाचोरा शहरातील मोंढाळा रस्त्यालगत एका घरात प्रेमीयुगुलांची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२३
सद्यस्थितीत प्रेम प्रकरणातून आत्महत्या होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. असाच एक प्रकारात पाचोरा शहरातील मोंढाळा रस्त्यावर असलेल्या एका घरात उघडकीस आला आहे. मोंढाळा रस्त्यावर असलेल्या एका घरात दोन वेगवेगळ्या समाजाच्या तरुण व तरुणी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडली आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतले असता सदर तरुण व तरुणींचे मागील काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. परंतु कुटुंबीयांना हे मान्य नव्हते किंवा माहीत नव्हते आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न २३ जून २०२३ शुक्रवार रोजी नुकतेच झाले होते व ती आता घरी आले होती याच कालावधीत दिनांक २५ जून रात्री ते २६ जून च्या सकाळपर्यंत दोघांनीही एकाच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
“या घटनेबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरु आहे”
(याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)