कळमसरा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील हरीश राजेंद्र मोरे वय अंदाजे (२८) वर्षे या तरुण शेतकऱ्यांने आज रात्री तीन वाजेच्या सुमारास घरातून एकटा निघून कळमसरा गावाजवळील दत्तू सिताराम चौधरी यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता हरीश हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यानावे गट नंबर ६२८ ही शेतजमीन आहे. त्याचेवर एस. डी. एफ. सी. बॅंक पाचोरा शाखेचे अंदाजे दहा लाख रुपयापर्यंत थकित कर्ज आहे. तसेच गरजेपोटी त्याने गावातीलच तीन ते चार खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. ह्या खाजगी सावकाराकडून मयत हरीश याच्यामागे सावकारीचे पैसे वसुलीसाठी सतत तगादा सुरु होता. तसेच पैसे वसुलीसाठी एका सावकाराने काही दिवसांपूर्वी त्याला धमकी दिल्याची माहिती गावातील ग्रामस्थांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर माहित झाली याबाबत गावातील ग्रामस्थांमध्ये कुजबुज सुरु आहे. म्हणून त्याने कर्जबाजारी पणाला तसेच सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.