लोहारा येथील व्यायामशाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर, तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे व्यायामशाळेच्या इमारतीसाठी माननीय नामदार गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव व आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने सन २०२१/२०२२ च्या व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून ११ लाख ९९ हजार ६९८ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकास जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री.मिलिंदजी दीक्षित (कुलकर्णी साहेब) यांनी नुकतीच मंजूरी दिली असून सदर कामाला सुरुवात करण्यासाठीचे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे.
लोहारा येथील व्यायाम शाळेच्या इमारतीला मंजुरी व सोबतच कामाला सुरुवात करण्यासाठीचे पत्र प्राप्त होताच लोहारा येथील ग्रामस्थ व नवतरुणांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली आहे. कारणही तसेच आहे. लोहारा हे गाव मोठ्या लोकसंखेचे गाव असून या गावात शिक्षणासह व्यायामाची गोडी असणारे नवतरुण मोठ्या संख्येने आहेत. तसेच काही कुस्ती पटू व क्रिडा पटूंनी या गावातील तरुणांमध्ये व्यायाम व खेळांची आवड निर्माण केल्यामुळे या तरुण मंडळीला व्यायामासाठी चांगली व्यायामशाळा पाहिजे म्हणून गावातील स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधी, गावकरी मंडळी व तरुणांन जवळपास मागील नऊ वर्षांपासून प्रयत्नशील होते.
परंतु जेव्हा, जेव्हा निवडणूका आल्या तेव्हा, तेव्हा निवडणूकीच्या आखाड्यात व्यायामशाळेची मागणी करण्यात आली, व या निवडणूकीचा आखाडा गाजवतांना आमदार व माजी मंत्र्यांनी आश्वासन देत मतदान मिळवून घेतले. मात्र तरुणांना व्यायामशाळेसाठी कोणत्याही प्रकारे मदत न केल्याने लोहारा येथील तरुणांच्या पदरी निराशाच आली. परंतु आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून व्यायाम शाळेचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
लोहारा येथील तरुणांच्या या नऊ वर्षानंतरच्या प्रतिक्षेला जिल्ह्याचे नेते मा.श्री. संजय दादा गरुड,क्षजिल्हा परिषद गटाचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. दीपक सिंग राजपूत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अरुणभाऊ पाटील, तसेच पालकमंत्री मा.श्री. गुलाबराव पाटील तसेच यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. विश्वनाथ पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर कामाला यश मिळवून दिले तसेच सदर व्यायामशाळेच्या काम त्वरित मंजूर व्हावे म्हणून सत्तेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी व्यायामशाळेच्या इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देत बांधकामासाठी लागणारे उर्वरित पाच लाख रुपये खर्च ग्रामपंचायतीतर्फे देणार असल्याने लोहारा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायतीत सदर काम तात्काळ मंजूर व्हावे ,म्हणून ग्रामपंचायत सत्तेत असलेले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांनी व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी जागा देण्यापासून ते उर्वरित पाच लाख रुपयेचा वाटा ग्रामपंचायत मधून देण्यासाठी केला गेला. व सदर कामास मान्यता दिली. त्यामुळे गावातील तरुण मुलांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे .भविष्यामध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यामध्ये लागणारे सर्व व्यायामाचे साहित्य ही शासनाकडून मंजूर केले जाईल, याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले आहे, तसा दुजोरा सरपंच अक्षयकुमार जयस्वाल यांनीही सांगितला आहे. व्यायाम शाळेच्या इमारत मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वरील सर्व मान्यवरांचे गावच्या वतीने सरपंच जैस्वाल यांनी आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच अमृतभाऊ चौधरी,उपसरपंच पती हिरालाल जाधव ,तरुण नेतृत्व ईश्वर भाऊ देशमुख ,सुरेश गरबड चौधरी, अशोक क्षीरसागर ,आबा चौधरी, सुरेश मोरे ,अर्जुन पाटील ,ग्राम विकास अधिकारी गजानन काळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकराव गीते ,सामाजिक कार्यकर्ते संदीप वेंकट कोळी ,रामेश्वर जाधव, रविंद्र संभाजी पाटील ,राहुल जैन, इस्माईल दादा ,गफार मिस्तरी, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके,महेंद्र शेळके ,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार दिनेश चौधरी,अतुल माळी, ज्ञानेश्वर चौधरी ईश्वर खरें इत्यादी मान्यवर यावेळी हजर होते.