सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत, विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०२/२०२४
पाचोरा येथील नामांकित गिरणाई शिक्षण संस्था संचलित सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान दिनानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शन (Science exhibition) आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. पुजाताई अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील २२५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ७५ वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स सादर केले होते. शाळेचे मुख्याध्यापक समाधान महाजन यांनी या वैज्ञानिक प्रयोग व मॉडेल्स बाबत माहिती दिली.
या विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक प्रयोग व मॉडेल्स पाहून संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, सौ. सा. प. शिंदे , शाळेचे मुख्याध्यापक सु नि. पाटील व पर्यवेक्षक महेश देशमुख तसेच उपस्थित पालक, भगिनींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.