लॉकडाऊन पाळणारे उपाशी, कायदा मोडणारे तुपाशी. कडक कारवाई करण्याची गरज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत जिल्हाधिकारी साहेब मा.श्री.अभिजितजी राऊत यांनी दिनांक २८, २९ व ३० मार्च या कालावधीत शंभर टक्के लॉकडाऊन लागु केला आहे.
त्यानुसार तालुकास्तरीय अधिकारी तसेच विशेषकरून पोलीस खाते अथक परिश्रम घेत आहेत. परंतु तरीही गावागावातून बऱ्याच व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय सुरू ठेवल्याने लॉकडाऊन पाळण्यात आला नसल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे शहरातुन लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी तालुकास्थरीय अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची मोठी फौज असल्याने शहरातील व्यवसाईकांनी आपपली दुकाने बंद ठेवली होती.
तर दुसरीकडे काही शहरातील व्यवसाईकांनी आपपल्या चारचाकी, दुचाकी वाहनांच्या माध्यमातून खेडेगावात फिरता व्यवसाय केल्याने खेडेगावात या फेरीवाल्यांच्या दुकानावर एकच गर्दी जमा झाल्याने(सामाजिक अंतर)लॉकडाऊचा फज्जा उडाला.
तसेच खेडेगावातील काही व्यवसाईकांनी मनमानी करत आपले व्यवसाय सुरुच ठेवले तर दुसरीकडे लॉकडाऊचा नियम पाळणारे मात्र हातावर हात ठेवून बसलेले होते. म्हणजेच (कायदा मोडणारे तुपाशी व कायदा पाळणारे उपाशी) अशी गत झाली होती.
यामागील कारण म्हणजे बऱ्याचशा खेडेगावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची जबाबदारी विसरल्याने व बरचसे ग्रामसेवक मुख्यालयात रहात नसल्याने लॉकडाऊचा फज्जा उडाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे.