सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›गोदातीरावरील ३०० देवस्थानांच्या पुनर्वैभवासाठी प्रवरासंगमपासून धोत्रेपर्यंत रस्ता तयार व्हावा नागपुर येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

गोदातीरावरील ३०० देवस्थानांच्या पुनर्वैभवासाठी प्रवरासंगमपासून धोत्रेपर्यंत रस्ता तयार व्हावा नागपुर येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

By Satyajeet News
January 24, 2022
746
0
Share:
Post Views: 175
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२२

नागपूर येथील प्रवरासंगम जवळील कायगाव येथून धोत्रे (समृद्धी महामार्गापर्यंत) रस्ता तयार करावा, अशी मागणी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे. कारण या ६० किमीच्या रस्त्यामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ३०० देवस्थानांना गतवैभव प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे इतरही लाभ या रस्त्यामुळे होऊन परिसराच्या विकासात साह्य ठरू शकते असे मत व्यक्त केले आहे.

गोदावरी’ नदीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्ण महाराजांचे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात महानुभाव पंथ स्थापन केला. त्यांनी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची निवड करीत आपले तत्वज्ञान मराठीत निरूपण केले. यंदा स्वामींचे अवतरण अष्टशताब्दी वर्ष आहे. स्वामींचे श्रीक्षेत्र डोमेग्राम (कमालपूर) येथे बरेच दिवस वास्तव्य होते, येथुनच महानुभाव पंथाची पायाभरणी झाली. पंथियांच्या १६५० तीर्थस्थानांपैकी ३०० देवस्थाने या परिसरात आहेत. स्वामींच्या पदस्पर्शाने धोत्रे, हिंगोणी, पुरणगांव, पुणतांबा, सावखेड गंगा, नायगांव, नाऊर, वाजरगांव (सराला बेट), भालगांव, चांदेगांव, नागमठाण, हमरापूर, बाजाठाण, डोमेग्राम (कमालपूर), देवगांव, घोगरगांव, बेलपिंपळगांव, सुरेगाव, नेवरगांव, कानडगांव, ममदापूर, बागडी, जामगांव ही गावे पवित्र झालेली आहेत. दरवर्षी लाखो मंडळी या परिसरात दर्शनासाठी येतात.

परंतु अनेकांची इच्छा असूनही रस्त्यांमुळे वंचित राहतात. धोत्रे येथून समृध्दी महामार्गापासून हिंगोणी- पुरणगाव- सावखेड (गंगा)- सराला बेट- भालगांव- डाकपिंपळगांव- चांदेगांव- नागमठाण- हमरापूर- बाजाठाण- देवगांव- चेंडूफळ- हैबतपूर- नेवरगांव- कानडगांव- ममदापूर- बागडी- जामगांव- कायगांव (प्रवरासंगम) राष्ट्रीय महामार्गापर्यंत असा रस्ता तयार झाल्यास नगर जिल्ह्यातील कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा होईल. डोमेग्राम, सराला बेट आणि इतर धार्मिक ठिकाणांना पुन्हा वैभव प्राप्त होण्यास सहाय्य ठरेल.

श्री. चक्रधर स्वामींचे शिष्य पंडित म्हाइंभटांचे जन्म गांव ‘सराला’ची मराठी साहित्यात वेगळी नोंद आहे. गोदावरीच्या मधोमध असलेल्या   ‘सराला बेटा’वर औषधीयुक्त वनस्पती, फळबागा, गोशाळा असून नदीच्या दुतर्फा पर्यावणपूरक झाडे लावण्यात आली आहेत. बेटाच्या चारही बाजूने पुलांची बांधणी करून हेलिपॅड, व्यापारी संकुल, बेटासमोरच्या मैदानावर भव्य भक्तनिवास तसेच गोशाळा उभारण्यात येत आहे. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेटाकडे यायला धड रस्ता नाही, हे मोठे दुर्दैव म्हणाले लागेल.

दर एकादशीला या तिन्ही जिल्ह्यांतील १० ते १५ हजार वैष्णवांचा मेळा बेटावर जमतो. खड्यांत हरवलेल्या रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करीत भाविक ये-जा करतात. गोदेकाठच्या परिसरात मुबलक पाणी असूनही हा भाग विकासापासून दूर आहे. येथे दूध, भाजीपाला, फुले, फळे या लवचिक आणि नाशिवंत वस्तुंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुलभ आणि जलद वाहतूक व्यवस्था असल्यास या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होईल. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आराखडा तयार करावा, असे हरिहर पांडे यांनी अष्टशताब्दीच्या औचित्याने परिसराचा विकास व्हावा, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लिहीले आहे.

या रस्त्यामुळे होणारे विविध फायदे काय होतील ते पुढील प्रमाणे नमुद केले आहेत. यात १) धोत्रे ते कायगांव रस्त्यामुळे ३०० देवस्थाने जोडले जातील, यामुळे स्थानांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास सहाय्य, २) अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा, ३) ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांना गतवैभव प्राप्त होईल, ४)’सराला बेटा’चा विकास होऊन इतरत्र पर्यटनाला वाव, ५) समृद्धी महामार्गाला उत्तम कनेक्टीव्हीटी, ६) उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येईल, त्यामुळे शेतीला प्रोत्साहन, ७) नविन उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल, ८) सामाजिक जीवनमान उंचावेल असे नमूद केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद ...

Next Article

पाचोरा व भडगाव येथे आजपासून भरडधान्य खरेदीचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    नुतन वर्षात मानवा असे घडेल का ? (प्रासंगिक लेख किंवा बातमी स्वरूपात)

    January 3, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    श्री. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात भव्य रॅलीचे आयोजन.

    February 12, 2023
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    २६ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी पाचोरा शहरात अदिवाल परिवाराचा धम्म दिक्षा सोहळ्याचे आयोजन.

    November 24, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा सिंधी कॉलोनी मे चालिया साहेब ज़ी (चालीस दिन क़ा ऊपवास)

    July 28, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    भारतीयांच्या रोमारोमात प्रखर राष्ट्रवाद, माजी सैनिक संभाजी पाटील यांचे प्रतिपादन.

    August 8, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    शेतकऱ्यांचा विरोध असलेले ते तिन्ही कृषी कायदे मागे मा.पंतप्रधानांची घोषणा.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे स्वस्त धान्य दुकानातून धान्याची हेराफेरी करणारा तो गुरु कोण.

  • क्राईम जगत

    जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना अटक.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज