“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुद्रचा कौतुकास्पद अभिनय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०३/२०२३
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात असे म्हणतात कारण काही बालक लहानपणापासून कळत, नकळत आपल्या अंगी असलेले गुण प्रदर्शित करत असतात असाच एक अनुभव पाचोरा शहरातील लेखणीचे शिलेदार दैनिक नजरकैदचे विभागीय संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा. श्री. किशोर रायसाकडा यांचा मुलगा चिरंजीव रुद्रच्या अंगी असल्याचे दिसून आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रुद्र हा पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलीत शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये सिनियर केजी या वर्गात या वर्गात शिक्षक घेत आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शाळेत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या वेशभूषेत कार्यक्रम सादर करण्यात आले. या विविध कलागुणांच्या कार्यक्रमात अवघे पाच वर्षे वय असलेल्या रुद्र रायसाकडा याने श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति रूप भुमिकेत महाराजांच्या जीवनात घडलेले काही विस्मरणीय क्षण आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनातून हुबेहूब सादर करत शिक्षक, पालक व उपस्थितांची मने जिंकून घेतली. या कलागुणांना सगळ्यांनी दाद दिली.
रुद्रने त्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना सादर करतांना सर्व कसब पणाला लावले व तो एक आदर्श ठरला म्हणून शिंदे इंटरनॅशनल स्कूल तर्फे त्याला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
किशोर रायसाकडा.~
शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी रुद्रच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना हेरुन त्याच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन रुद्र कडून योग्य अशी तयारी करुन घेण्यासाठी मेहनत घेऊन रुद्रच्या अंगी असलेल्या गुणांचे प्रकटीकरण करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली म्हणून मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब मा. श्री पंडितराव शिंदे, युवानेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे, संस्थेचे सहसचिव गुरुवर्य मा. श्री. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉक्टर मा. श्री. विजय पाटील तसेच उपशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आभारी आहे.