अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळास्थरावर पहिल्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळास्थरावर पहिल्या मेळाव्याचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषर महाराष्ट्र पूणे स्टार्स प्रकल्प शाळा पूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन दिनांक १९ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी शाळास्तरावर संपूर्ण जिल्हाभरात करण्याचे ठरविण्यात आले होते. म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार सदर मेळाव्याचे आयोजन काल दिनांक १९ एप्रिल मंगळवार रोजी अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. राहुल शेळके यांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तसेच अंबे वडगावच्या प्रथम नागरिक व सरपंच श्रीमती कलाबाई शेळके यांच्या हस्ते फीत कापून सकाळी आठ वाजता करण्यात आले.
सदर मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू म्हणजे शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ या वर्षासाठीच्या इयत्ता १ ली साठी पात्र व प्रवेशित बालकांच्या सर्वांगीण विकास व बौद्धीक विकास व नविन वातावरण समरसतेसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत १) नोंदणी २) शारिरीक विकास ३) बौधिक विकास ४) सामाजिक आणि भावनिक विकास ५) भाषा विकास तसेच पालक उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉल लावलात आले होते. याप्रसंगी विविध वस्तूंची सजावट करुन प्रवेशित बालकांचे जंगी स्वागत करण्यात आले.
जिल्हापरिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळास्थरावर पहिल्या मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. राहुल शेळके (भोलाभाऊ), कायदेतज्ज्ञ व ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. मंगेशराव गायकवाड श्री. कैलास पाटील, श्री. शशीकांत पाटील, श्री. भावेश हडप, श्री. दिवाकर वाघ, श्री. मिलिंद मुसारे, श्री. श्यामकांत पाटील, श्री. मुकेश पाटील, श्री. संजय पाटील, श्री. विनोद पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. बबलू तडवी, श्री. राजेंद्र देवरे, श्री. अमोल पाटील यांच्यासह मुख्याध्या सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस व पालकवर्ग उपस्थित होते.