नेरी येथील जिल्हापरिषद केंद्र शाळेच्या अध्यक्षपदी रवींद्र देवकर..
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२२
जामनेर तालुक्यातील नेरी येथील जिल्हापरिषद केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून या समितीत नवीन तरुण युवकांना संधी देऊन त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी मा.श्री. राजू पाटील यांचे निकटवर्तीय मा.श्री. रविंद्र भिऊ देवकर तर उपाध्यक्षपदी मि.श्री. बबलू धनगर यांची निवड करण्यात आली असून विद्यार्थ्याच्या पालक वर्गातून मौसीमा शंकर बोरसे, श्री. मनोज राजेंद्र कोलते, सौ. सीता भिमसींग मोरे, श्री. भरत विठ्ठल खोडपे, सौ. निर्मला अशोकराणे, श्री. संजीव लक्ष्मण कुंभार, सौ. कल्पना युवराज भंगाळे, श्री. प्रमोद सुपडू खोडपे सौ. मनिषा संतोष कोळी, श्री. सुभाष सखाराम भोई, सौ. वैशाली राजेंद्र विसपुते, सौ. नयना संदीप कोळी, श्री. जनार्दन सुरेश पाटील सौ. मंजुषा गोरक्षनाथसपकाळे, सौ. विदया मिलींद येवले, पूनम चतरसिंग गोळवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीच्या वेळी नवनवीन युवकांना संधी देत मा.श्री. खोडपे सरांनी अलिप्त राहून ही संधी उपलब्ध करून दिली. या कार्यकारणी निवडीबद्दल ग्रामपंचायत सरपंच मा.श्री. सुभाष मोरे, उपसरपंच मा.श्री. प्रकाश भाऊ बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. विलास भाऊ खोडपे, प्रभारी मुख्याध्यापिका येवले मॅडम, मंजुषा मॅडम, प्रमोद पाटील सर, वांगेकर मॅडम, मनोज कोलते आदींसह पालक वर्गाने नवनियुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले.