पाचोरा शहरातील गिरड रस्त्यावर गो. से. हायस्कूल समोरच पाण्याचा डबका.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२२
पाचोरा शहरातील न्यायालयाकडे जाणाऱ्या गिरड रस्त्यावरील नामांकित शिक्षण संस्था गो. से. हायस्कूल समोरच पाण्याचे मोठे डबके साचले असून या रस्त्यावरून गो. से. हायस्कूल मध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारे हजारो विद्यार्थी व कामकाजासाठी न्यायालयात जाणारे तसेच इतर कामानिमित्त या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरुंना या पाण्याच्या डबक्यातून जावे, यावे लागत आहे.
या भररस्त्यावर पाणी साचल्यामुळे या गो. से. हायस्कूल समोरच एक प्रकारे जलाशयाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना खुपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष करुन महिलांना खुपच त्रास सहन करावा लागत असून गो. से. हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे उद्या याच परिसरात माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार येणार असल्याने या रस्त्यावर साफसफाई करून तात्पुरती सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी भुमिगत गटारी बनवून पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.