शिमोगा कर्नाटका येथे झालेल्या बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना कठोरात, कठोर शासन व्हावे. पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२२
कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्षा नामक बजरंग दल कार्यकर्त्याची जिहादी विषारी व धर्माध मानसिकता असलेल्या मुस्लिम समुदायाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्त आहे.
ही हत्या ज्या विखारी मानसिकतेने पछाडलेल्या कट्टर भारत विरोधी नेतृत्वाकडून मुस्लिम समाजात जे विष पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया एकॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे. असे असे कृत्य आम्ही कदापि खपवून घेणार नाही. असा इशारा देत
भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट अॅक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपीना अशा गंभीर प्रकारचे शासन करावे की पुन्हा अश्या प्रकारचे देश विघातक कृत्य करण्यास कुणी धजावनार नाही अशी मागणी व अशा आशयाचे निवेदन पाचोरा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे माननीय पाचोरा तहसीलदार साहेब व पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
तसेच सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया एकॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. असा सबुरीचा सल्ला देत कायदा कायद्याचे काम करेलच परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करून सुधरावे अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया एकॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाया संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. असे आवाहन विश्व हिंदू परिषद करीत आहे.
निवेदन देतांना पाचोरा शहर मंत्री विश्व हिंदू परिषद योगेश पाटील , प्रखंड मंत्री विश्व हिंदू परिषद महावीर गोड पाचोरा सचिन येवले, अतुल पाटील, दिपक राजपुत, बंटी पाटील, गजानन पाटील, दिपक मोरे, बंडू पांचाळ, गीतेश गुंजाळ, गजानन जोशी, जितु बजरंगी व इतर कार्यकर्ते हजर होते.