खडकदेवळा येथे कुत्र्याच्या हल्ल्यात ८५ वर्षीय वृध्द जबर जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२४
पाचोरा येथुन जवळच असलेल्या खडकदेवळा खुर्द येथील पांडुरंग सांडू दाभाडे वय वर्षे (८५) हे दैनंदिन कामानिमित्त शेताकडे जात असतांना खडकदेवळा खुर्द गावाच्या बाहेर एका मोकाट कुत्र्याने पांडुरंग दाभाडे यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवत उजव्या पायाला जोरदार चावा घेतला. कुत्र्याने तोंडात पायाला तोंडात घट्ट पकडून दाभाडे यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र दाभाडे यांनी आरडाओरडा केल्यावर आसपासच्या लोकांनी धावत जाऊन पांडुरंग दाभाडे यांना कुत्र्याच्या तावडीतून सोडवले म्हणून पुढील अनर्थ टळला. पांडुरंग दाभाडे यांना उपचारासाठी त्वरित पाचोरा नगरपालीका दवाखान्यात नेले असता याठिकाणी त्यांच्यावर त्वरित उपचार करुन जखम मोठी असल्याकारणाने पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता खडकदेवळा खुर्द गावात गावठी कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हे कुत्रे दिवसरात्र गावात धिंगाणा घालत असतात. यामुळे लहान मुलांना जिवीतास धोका निर्माण झाला असून या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.