दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२४

पाचोरा ते जामनेर या रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी कोणतीही परवानगी न घेताच काही ठिकाणी पत्र्याचे शेड उभारुन तर काही ठिकाणी पक्के बांधकाम करुन मोठमोठ्या हॉटेल, ढाबा व उपहारगृहाच्या नावाखाली आपली दुकाने थाटली आहेत. परंतु याठिकाणी शासनाकडून कोणत्याही रितसर परवानग्या न घेता बिनधास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री सोबतच देशी, विदेशी तसेच काही ठिकाणी गावठी दारुची विक्री केली जात आहे. तर काही हॉटेल्स व ढाबा मालकांनी जनाची नाही तर मनाचीही लाज न बाळगता आपल्या व्यवसायात दोन पैसे जास्त कमावण्याच्या नादात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या ढाब्यावर व हॉटेलमध्ये काही महिलांना आणून त्याठिकाणी गैरप्रकार सुरु असल्याचे चित्र काल सायंकाळी ३१ डिसेंबर २०२३ रविवार रोजी सायंकाळपासून तर ०१ जानेवारी २०२४ सोमवारपर्यंतच्या मध्यरात्री नंतर खुलेपणाने सुरु असल्याची चर्चा आज दिवसभरात पाचोरा, लोहारी, वरखेडी, वडगाव आंबे, मालखेडा, कोल्हे गावातील सुज्ञ नागरिकांतून ऐकायला मिळत होती व या गैरप्रकाराबाबत वरील गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत संबंधित शासन व प्रशासनाच्या बाबतीत तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कारण पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यान ठिकठिकाणी हॉटेल, ढाबा व उपहारगृहाच्या नावाखाली देशी, विदेशी व गावठी दारुची खुलेआम विक्री केली जात असल्याने या ठिकाणी आसपासच्या गावातील, खेड्यापाड्यातील व रस्त्यावरुन जाणारे, येणारे वाहनचालक व वाटसरु या ठिकाणी बिनधास्तपणे दारु पिऊन आपल्या ताब्यातील वाहने चालतांना दिसून येतात यामुळे अल्पवयीन मुलेही दारुच्या आहारी जाऊन व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत. तसेच काही ठिकाणी अनैतिक देह व्यापार केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यामुळे अल्पवयीन मुले तसेच काही आंबट शौकीन वाममार्गाला लागुन घराघरात भांडणतंटे होऊन सुखी संसाराची राखरांगोळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या आठ दिवसांत पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावरील अनाधिकृत सर्व हॉटेल्स, ढाबे व उपहारगृहात सुरु असलेली अवैध दारु विक्री तसेच अनैतिक व्यवसाय बंद न झाल्यास गावागावातील सुज्ञ नागरिक व महिलावर्ग आपल्या तालुक्याचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांच्याकडे तसेच मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार करुनही काहीएक फायदा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहे.

************************************************************
‘त्याच टिकीटावर तोच खेळ’
********************************************”***************
तसेच पाचोरा ते वरखेडी दरम्यान पाचोरा शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका लॉजवर काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतु अद्यापही त्या ठिकाणी त्याच टिकीटावर तोच खेळ सुरु असल्याचे दिसून येत असून पाचोरा तालुक्यात कायद्याचा धाक संपला की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

***********************************************************
हा घ्या पुरावा
***********************************************************
नवऱ्याने केला विश्वासघात, बायको पोहचली पोलीस स्टेशनात. विवाहबाह्य अनैतिक संबंधांमुळे अनेक संसाराची राखरांगोळी. https://satyajeetnews.com/21767/

सत्यजित न्यूज पोर्टलवर वरील बातमी सर्च करुन बघा.