सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने, चंद्रयान ३ या उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांचे पाचोरा ते जामनेर रस्त्यावर भरवले प्रदर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२३
सद्यस्थितीत आपला देश विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन प्रगतीपथावर आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या देशाने स्वताच्या बनावटीचे चंद्रयान ३ या उपग्रहाचे नुकतेच यशस्वीपणे उड्डाण करुन हे चंद्रयान आज सुखरुप पणे चंद्रावर पोहोचल्यावर भारताची मान संपूर्ण जगात उंचावली आहे.
मात्र ही चंद्रयान मोहीम का राबवण्यात आली, यापासून आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला काय फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती चंद्रयान ३ या उपग्रहाची मोहीम पूर्ण झाल्यावर सगळ्यांना माहीत होणारच आहे. मात्र तोपर्यंत जनतेच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून तुर्तास चंद्रयान ३ या उपग्रहाने काही छायाचित्रे पाठवली असून याची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या छायाचित्रांच्या प्रतिकृती जनतेसमोर ठेवण्यासाठी इतर कोणत्याही ठिकाणी प्रदर्शन न भरवता पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा ते वरखेडी दरम्यान त्या प्रतिकृतीच्या आकाराचे खाच, खळगे, खड्डे या स्वरुपात जनतेसमोर ठेवण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न केला आहे.
म्हणून या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी चंद्रयान ३ या उपग्रहाने पाठवलेल्या प्रतिकृती पाहूनच आपले वाहन चालवत या छायाचित्रांचा अभ्यास करावा नाहीतर उगाचच दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची किंवा हातपाय किंवा जीव गमावण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने
लवकरच ठिकठिकाणी सुचना फलक लावण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.