दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२२

शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये नातेवाईकांची लुडबुड व शासकीय कामातील हस्तक्षेप थांबवण्यासाठी शेंदुर्णी येथील सुज्ञ नागरिक लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाले आहे. कारण मागील काही दिवसांपूर्वी प्रारुप विकास आराखडा व जाचक करवाढ रद्द करण्यासाठी व्यापारी संघटनेतर्फे शेंदुर्णी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा व्यापारी प्रतिनिधी शेंदुर्णी नगरपंचायतीवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नसल्याने मुख्याधिकारी यांच्याकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी गेले असता मागण्या समजून सांगत मुख्याधिकाऱ्यांना खुलासा मागितला होता व मुख्याधिकारी व्यापारी वर्गाशी चर्चा करत असतांनाच एका नगरसेविकेचे पती यांनीच प्रसारमाध्यमांचा माइक घेऊन मोर्चेकरी व्यापारी वर्गासोबत हुज्जत घातल्याची चित्रफीत समोर आली आहे. ती आपणा समोर सादर करीत आहोत.


सबस्क्राईब करा व लाईक करा

सद्यस्थितीत ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो किंवा नगरपंचायत असो अश्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचे नातेवाईक किंवा महिला पदाधिकाऱ्यांचे पतीदेव, भाऊ व इतर नातेवाईक कार्यालयात बसून बिनधास्तपणे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीचे कामकाजात लक्ष घालून कोणतेही अधिकार नसतांना मुख्याधिकारी, ग्रामसेवक व त्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या कर्मच्याऱ्याला आदेश देत नको ती कामे करुन घेत ढवळाढवळ करत असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे.

विशेष म्हणजे स्री, पुरुष समानतेच्या दृष्टीकोनातून सरकारणे राज्य कारभार महिलांना सामावून घेण्यासाठी स्री राखीव जागांची शक्ती केली आहे. परंतु आजच्या परिस्थितीत महिला राज नावालाच असल्याचा अनुभव येत मासिक मिटिंग, ग्रामसभा, आमसभा, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व विविध राष्ट्रीय व शासकीय कार्यक्रमात महिला पदाधिकारी घरी असतात व त्यांच्या जागेवर त्यांच्या गोतावळ्यातील पती, भाऊ, मुलगा व इतर पुरुष मंडळीच कार्यालयातील खुर्चीवर बसलेले आढळून येतात.

याबाबत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करु नये विशेषतः त्यांनी पदाधिकान्यांच्या अर्थात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत कार्यालयांमधील कामकाजात हस्तक्षेप करु नये तसेच कार्यालयात मुळीच बसता कामा नये. असे निर्देश शासनाने दिलेले असल्यावर ही शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये नागरिकांना वेगळाच अनुभव येत असून पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक मुख्याधिकारी यांच्या कामकाजात हस्तक्षेप करून नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याने शेंदुर्णी नगरीतील सुज्ञ व अनेक समस्यांनी त्रस्त नागरिक लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करुन शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची लुडबुड थांबवण्याची मागणी करणार आहेत.