पाचोरा शहरातील राधास्वामी पेट्रोल पंपाच्या पुढे भररस्त्यावर दुकान थाटल्यामुळे अपघाताची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२३
पाचोरा शहरातील भारत डेअरी थांब्यापासून पुढे असलेल्या राधास्वामी पेट्रोल पंपाच्या पुढे थोड्याच अंतरावर पाचोरा ते जामनेर वळणाच्या रस्त्यावर एका व्यवसायीकाने टेबल, खुर्च्या व इतर वस्तू विक्रीसाठी दुकान थाटले असून या दुकानाजवळच स्वमालकीचे चार चाकी वाहन (टेम्पो) उभा केला असल्याने भररस्त्यात अतिक्रमण झाल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच याच ठिकाणी वळणदार रस्ता असल्याकारणाने पाचोरा शहराकडून जामनेर, जळगाव कीवा सिंधी कॉलनी, मोंढाळा तसेच इतर खेड्यापाड्यातील वाहनधारकांना समोरुन येणारी वाहने दिसत नसल्याने तसेच या रस्त्यावर मांडलेल्या दुकानावर ग्राहकांची एकच गर्दी असल्याने वाहन चालवतांना त्रासदायक ठरत असून याठिकाणी एखाद्या वेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून पाचोरा शहरातील राधास्वामी पेट्रोल पंपाच्या पुढे भररस्त्यावर व्यवसायीकाने थाटलेले दुकान त्वरित काढण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिक, लहानमोठे वाहनधारकांनी केली असून या अतिक्रणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व पाचोरा नगरपरिषद का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.