वैशाली राठोड.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२४

सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील राजकारणात कमालीची चढाओढ सुरु झाली असून जो, तो आपल्या पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील आहेत. याच चढाओढीत आज अंबे वडगाव येथील प्रगतिशील शेतकरी विजय बाबूलाल वाघ यांचे चिरंजीव डॉ. चेतन वाघ याचे लहान बंधू युवा नेतृत्व मा. श्री. पवन वाघ यांनी भारतीय जनता पक्षाचे मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यांच्या प्रवेशाने अंबे वडगाव परिसरात भारतीय जनता पक्षाच्या बळकटीकरणात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.