दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२३

मुंबई येथील माया फाउंडेशन तर्फे पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथे दिनांक १६ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी अनिल विष्णू पाटील व सौ. माया अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते गरजू नागरिकांना ब्लॅंकेट तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भातखंडे गावच्या सरपंच शोभाबाई पाटील, उपसरपंच विलास कुमावत, सदस्य संगीता पाटील, कमलबाई भील, दीपक कुमावत, दत्तू कुमावत, धनंजय पाटील, रवींद्र कुमावत, सुबलाल कुमावत, देविदास पाटील, विकासोचे चेअरमन पंढरीनाथ कुमावत, विकास खैरनार, प्रल्हाद पाटील सह समस्त ग्रामस्थ मंडळी आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.