दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२३

पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथील संशयित आरोपी अमोल जयेंद्र संसारे वय वर्षे (३१) याच्या विरोधात दिनांक १५ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी, सकाळी ०४ वाजता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३५४/२०२३ आय. पी. सी. कलम ३५४ (ब), ५०६ सह पोस्को कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथील अल्पवयीन मुलगी ही तीच्या घरासमोरील अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी अमोल जयेंद्र संसारे वय वर्षे (३१) याने तीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्या हातावर हात फिरवत वाईट हेतूने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता सदर मुलीने जोरजोरात आरडाओरडा केला असता संबंधित संशयित आरोपीने तीला दमदाटी करत चुप बस कोणाला काही सांगू नकोस नाहीतर मी तुझे तुकडे, तुकडे करुन फेकून देईल अशी धमकी देऊन दमदाटी करुन सोडून दिले अशी फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिल्यावरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला शोधून अटक करुन जळगाव येथील माननीय विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेबाबत पंचक्रोशीतील गावागावातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.