सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा कारभार म्हणजे, आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१०/२०२२
गोरगरिबांच्या घरची चुल पेटावी व कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकार दरमहा कित्येक कोटी रुपयांची झळ सोसून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शासकीय दराने तसेच मोफत धान्य उपलब्ध करुन दिले आहे. परंतु हे गोरगरिबांच्या नावाने त्यांच्या वाट्यावर येणारे धान्य वाटप करतांना संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याने या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजारात होऊन हे गोरगरिबांचे धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याचे जनमानसातील चर्चेतून समोर येत आहे. यामुळे (गरीबांचे पोट अधिक, आधिक खोल चालले असून धान्याचा काळाबाजार करणारे रेशन दुकानदार व हप्ते घेऊन या भ्रष्टाचाराला मुक संमती देणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढेऱ्या फुगत चालल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी प्रसारमाध्यमांन समोर व्यक्त केले आहे.)
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील दोन, चार दुकाने सोडली तर सगळ्याच स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्ररी समोर येत आहे. यात मागील एक वर्षापासून सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी पाचोरा पुरवठा विभागातील अधिकारी, पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्याकडे वारंवार अर्जफाटे व तक्रारी करुनही काहीएक फायदा होत नसल्याने सेल्समन शंकर पवार यांची मनमानी वाढली असून रेशनकार्ड धारकांवर दादागिरी करतात अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच शंकर पवार यांना जाब विचारल्यास ते जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवर खोट्या तक्रारी दाखल करतात म्हणून त्यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी केल्यावरही सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व गावातील काही दलाल शंकर पवार यांना पाठीशी घालत असल्याने त्यांचा मनमानी कारभार आजही मोठ्या प्रमाणात सुरुच असल्याने रेशनकार्ड धारकांना पुरेसा धान्य पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी घेऊन धान्यापासून वंचित राहात असलेले रेशनकार्ड धारक दारोदार फिरत आहेत.
“पुरवठा विभागाकडून कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप”
वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करुन रेशनकार्ड धारकांना त्यांच्या हक्काचे धान्य वाटप करण्यात यावे म्हणून पाचोरा पुरवठा विभागाकडून योग्य ती कारवाई करणे गरजेचे असतांनाच पाचोरा पुरवठा विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या संस्थेला व सेल्समनला अभय देत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून सद्यस्थितीत कार्यरत असलेले सेल्समन शंकर पवार व रेशनिंग दुकानाशी काहीएक संबंध नसतांना दुकानात लुडबुड करत ग्राहकांना दमदाटी करणारा त्यांचा मुलगा यांना या रेशनिंग दुकानातून काढण्यात यावे अशी लेखी स्वरूपात मागणी केली असल्यावर ही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
(सेल्समन “आम्ही हप्ते देतो मग हे हप्ते घेणारे कोण”)
सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करतांना ई पॉस मशिनवर अंगठा घेतला जातो मात्र पावती दिली जात नाही. तसेच रेशनकार्ड धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार त्यांच्या हक्काचे पुरेपूर धान्य वाटप केले जात नसून प्रत्येक रेशनकार्ड धारकांना मोजकेच धान्य वाटप केले जाते व याबाबत जाब विचारल्यास किंवा पावती मागितल्यास दमदाटी करून हमरीतुमरीवर येऊन पोलीसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते व (आम्ही हप्ते देतो) तुम्ही कुणाकडेही जा आमचे कोणीही काहीच वाकडं करुन घेणार नाही अशी भाषा वापरली जाते आहे. तसेच दोन दिवसांवर दिपावलीचा सण येऊन ठेपला आहे. आतातरी पुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सेल्समनची मनमानी थांबवण्यासाठी दुसऱ्या सेल्समनची नियुक्ती करण्यासाठी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व संचालक मंडळाला भाग पाडावे अशी मागणी केली जात आहे.
महत्वाचे~ शंकर पवार हे सेल्समन आहेत मग याच दुकानात ई पॉश मशीनवर त्यांचा मुलगा कशासाठी लुडबुड करतोय असा प्रश्न उपस्थित केला जात असून ई पॉश मशीनवर अंगठा घेतल्यानंतर कोणतीही पावती दिली जात नसल्याने रेशनकार धारकांना किती धान्य वितरीत केले गेले आहे याची नोंद व खात्री होत नसल्याने व पूरेपूर धान्य वाटप करण्यात येत नसल्याच्या तक्रारी व अर्जफाटे करुनही काहीएक कारवाई होत नसल्याने शेवटी आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत सत्य परिस्थीती जाणून घेण्यासाठी लवकरच पुरवठा विभागाकडून खुलासा घेण्यात येणार असून या आरोप, प्रत्यारोपाबाबत खरा प्रकार नेमका काय आहे ते समोर येईल.