दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२३

कापूस व्यापारी, मालक मोठे उद्योगपती यांचे संघटन असल्याकारणाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या कापसाची मातीमोल भावत खरेदी केली जात होती. यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच रडकुंडीला आलेला शेतकरी हतबल झाला होता. ही बाब लक्षात घेऊन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळवून देता येईल हे धोरण लक्षात घेऊन याकरिता पाचोरा तालुक्याचे ठिकाण सी. सी. आय. च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज पाचोरा येथील उद्योगपती श्री. राजाराम सोनार व श्री. प्रमोदभाऊ सोनार संचलित गिरड रस्त्यावर असलेल्या श्री. गजानन जिनिंगमध्ये आज सी. सी. आय. केंद्रप्रमुख मा. श्री. योगेश थाळनेरकर यांच्या उपस्थितीत
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मा. श्री. गणेश पाटील तसेच श्री. गजानन जिनिंगचे संचालक श्री. प्रमोदभाऊ सोनार हस्ते काट पुजन करुन गोंदेगाव येथील कापूस उत्पादक शेतकरी आरोफावी हसन खाटीक यांचा रुमाल, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करुन कापसाला प्रतिक्विंटल ७२००/०० रुपये भाव देऊन कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर बाजार समितीचे संचालक श्री. विजय कडु पाटील, श्री. इसुफ पटेल, सी. सी. आय. केंद्राचे श्री. योगेश थाळनेरकर, बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक श्री. अशोक देवरे, श्री. आर. व्ही. पाटील, श्री. व्ही. सी. पाटील, श्री. निखील पवार, गजानन जीनींगचे कर्मचारी श्री. गोपाल शर्मा, कुंदन गायकवाड, श्री. अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक मा. श्री. अशोक देवरे यांनी प्रास्ताविक, बाजार समितीचे लिपिक मा. श्री. व्ही. सी. पाटील यांनी सुत्रसंचलन तर श्री. गजानन जिनिंगचे संचालक उद्योगपती मा. श्री. प्रमोदभाऊ सोनार यांनी आभारप्रदर्शन प्रदर्शन केले. याप्रसंगी बहुसंख्य कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

****************************************************************
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील यांचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन.
****************************************************************

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व सी. सी. आय. यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील श्री. गजानन जिनिगमध्ये कापूस खरेदी सुरु करण्यात आली असून जिनिंगचे संचालक मा. श्री. गजाननभाऊ सोनार, सी. सी. आय. चे केंद्र केंद्रप्रमुख योगेश थाळनेरकर व शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधुन कापूस खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांनी सी. सी. आय. ची नवीन कापूस खरेदी प्रणाली समजून घेत
समजदारी व सबुरीने आपला कापूस सी‌. सी. आय. च्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा तसेच आधारकार्ड व लिंक असलेले बॅंक खाते क्रमांक सोबत आणावे म्हणजे शेतकऱ्यांना योग्य भाव व तात्काळ पैसे खात्यावर टाकता येतील व रक्कम मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत असे सुचीत करत करत उपस्थितांचे आभार मानले.