आले पोलिसांच्या मना तेथे कुणाचे चालेना, एक वर्षापासून फरार असलेल्या कापूस व्यापाऱ्याला अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वाडी येथील आरोपी राजू पाटील याने मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. सदर आरोपी हा सुमारे वर्षभरापासून फरार होता त्याचा सर्व प्रकारे शोध घेता तो मिळून येत नव्हता.

परंतु तरीही पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी तपास सुरुच ठेवला होता. अश्याच गोपनीय पद्धतीने तपास सुरु असतांनाच सदर आरोपी हा गुजरात राज्यातील नवसारी येथे असल्याबाबत माहिती मिळून आल्याने
मा. पोलिस अधिक्षक श्री. एम. राजकुमार सर, मा. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, मुकेश लोकरे, यांना गुजरात येथे रवाना केले त्यांनी अतिशय गोपनीय व सतर्कतेने सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन दिनांक २५ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी पाचोरा येथे मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीस ३० जानेवारी २०२३ सोमवार पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.

या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे, पोलिस कॉन्स्टेबल उज्वल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील , पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस नाईक अरुण पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम,पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास “आले पोलिसांच्या मना, तेथे कुणाचे चालेना” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आरोपीला अटक केल्याबद्दल जनतेतून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांचे कौतुक केले जात असून फसवणूक झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या