दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२३

मागील महिन्यात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वडगाव आंबे गावाजवळील पारिमांडल्य महानुभाव आश्रमापासून ते वडगाव आंबे गावाच्या बसस्थानकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत डांबरीकरणापासून काही फुटांच्या अंतरावर पथदिवे बसवण्यासाठी विद्युत खांब उभारण्यात आले असल्याने याठिकाणी अतिक्रमणात अजून भर पडली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता हे पथदिव्यांसाठीचे उभारण्यात आलेले खांब खासदार मा. श्री. उन्मेष दादा पाटील यांच्या निधीतून २८ लाख रूपये खर्चून उभारण्यात आले आहेत. हे खांब त्वरित काढण्यासाठी गावकऱ्यांनी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असूनही तो जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत विद्युत खांब उभे करत असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल व खांब काढण्यासाठी भाग पाडले जाईल असे सांगितले आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत हे पथदिव्यांसाठीचे खांब उभारले असल्याने हे खांब कसे हटवावे हा गहन विषय निर्माण झाला आहे.

मात्र भविष्य या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असून रुंदीकरण करण्यासाठी नुकतेच मोजमाप करण्यात आले आहे. ज्यावेळी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल त्यावेळी हे पथदिव्यांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांचे खांब काढून टाकले जाणार असल्याने हा खासदार निधी पाण्यात जाण्यार असल्याचे दिसून येत असल्याने सुज्ञ नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून हे खांब त्वरित काढण्यासाठी दिलीप जैन लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

*महत्वाचे*
पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाने गलथान कारभारामुळे पाचोरा ते वडगाव आंबे या अंदाजे १६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरुन प्रवास करतांना वाहनधारकांसह एस. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच याच रस्त्यावर वाढते अतिक्रमण, रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच योग्य ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले नसल्याने वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या सर्वसामान्य वाटसरूंच्या जीविताला धोका निर्माण झाला असुन दररोज लहान, मोठ्या अपघातांची मालिका सुरु असल्याचे दिसून येते.

याबाबत सविस्तर वृत्त असे पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा शहरापासून पुर्वेकडे वडगाव आंबे गावापर्यंतचा अंदाजे १६ किलोमीटर रस्ता हा पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेत येतो व याच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर दररोज लहानमोठे अपघात होऊन वाहनधारकांच्या वाहनाचे नुकसान होत असुन या अपघातामुळे काही वाहनधारकांना किरकोळ दुखापत तर काही वाहनधारकांच्या हातात, पायाला अस्थिभंग (फ्रॅक्चर) होत असल्याने नहाकच निष्पाप वाटसरुंना दवाखान्याच्या खर्चासह अंपगत्वाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पाचोरा ते वडगाव आंबे या १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर असलेल्या गावागावातील बसस्थानक, शाळा, कॉलेज व गाव, वस्तीजवळ काही ग्रामस्थांनी व काही व्यवसायीकांनी रस्त्याच्या अगदी कडेला रहदारीला अडथळा निर्माण होईल अश्या ठिकाणी अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे अतिक्रमित ठिकाणी असलेल्या हॉटेल, पानटपरी, चहाची दुकाने तसेच बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमलेले असतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहनधारकांना आपले वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

*महत्वाचे*
महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वडगाव आंबे गावाजवळील पारिमांडल्य महानुभाव आश्रमापासून ते वडगाव आंबे गावाच्या बसस्थानकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत डांबरीकरणापासून काही फुटांच्या अंतरावर पथदिवे बसवण्यासाठी विद्युत खांब उभारण्यात आले असल्याने याठिकाणी अतिक्रमणात अजून भर पडली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता हे पथदिव्यांसाठीचे उभारण्यात आलेले खांब खासदार मा. श्री. उन्मेष दादा पाटील यांच्या निधीतून २८ लाख रूपये खर्चून उभारण्यात आले आहेत. हे खांब त्वरित काढण्यासाठी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लवकरच कारवाई करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.