बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व मृत्यूपत्र बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न फसला गुन्हा दाखल.भाग (२)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रम, श्री कृष्ण मंदिर, जामनेर तालुक्यातील मौजे शहापूर येथील महानुभाव आश्रम व भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील महानुभाव आश्रम व इतर स्थावर मालमत्ता ही रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या मालकीची असल्यावर ही भातखंडे येथील साधका शिष्य मोहन येळमकर यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून स्वताच्या नावे करुन घेतल्याबद्दल रविराज मुकुंदराज येळमकर यांनी फिर्याद दिल्यावरुध पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारीमांडल्य आश्रमाचे पूर्वीचे महंत आचार्य मुकुंदराज येळमकर यांनी त्याच्या वृध्दपकाळामुळे त्यांच्या पाश्चात्य आश्रमाचे पुढील महंत म्हणून रविराज मुकुंदराज येळमकर यांना महंत पद बहाल केले आहे. तसेच सोबतच पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, भडगाव तालुक्यातील भातखंडे व जामनेर तालुक्यातील शहापूर येथील सर्व मंदिरे, आश्रमाच्या वास्तू व इतर स्थावर मालमत्तेचा अधिकार देण्यात आला होता.
परंतु रविराज मुकुंदराज येळमकर यांना महंती दिल्याने याच आश्रमातील महंत आचार्य मुकुंदराज येळमकर याचे साधका शिष्य मोहन येळमकर हल्ली मुक्काम भातखंडे तालुका भडगाव यांना ही गोष्ट सहन न झाल्याने त्यांनी इतर काही लोकांना हाताशी धरून कट रचून महंत आचार्य मुकुंदराज येळमकर यांचे दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालयातून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृतूपत्र तयार करून आश्रम, मंदिर व इतर स्थावर मालमत्ता नावावर करणेसाठी तलाठी, आंबेवडगांव यांचेकडे सादर करून रविराज मुकुंदराज येळमकर यांची एकप्रकारे फसवणूक केली आहे.
यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून मौजे आंबेवडगाव शिवार शेत गुट नं ९८ व ९४/२ वरील पारीमांडल्य महानुभाव आश्रम व मंदार, मौज शहापुर शिवार रात गट नं. ५४८/१ वरील महानुभाव आश्रम तसेच मौज भातखंडे बुद्रुक शिवार रात गटनं ६४ वरील महानुभाव आश्रम या मुकुंदराज येळमकर यांच्या मिळकती प्रॉपर्टी आरोपी मोहन येळमकर यांनी स्वताच्या नावावर करणेसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजीचे ११ वाजेपासून ते ०२ जुलै २०२२ रोजीचे १० वाजेचे दरम्यान तलाठी, आंबेवडगांव यांचेकडे सादर करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा कट उघडकीस आला आहे.
याबाबत अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे महंत रविराज मुकुंदराज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२२ भादवी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२,१२० व प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच पैकी मोहन येळमकर (भातखंडे), संतोष शेनफडु बडगुजर (वरसाडे) व नितीन पंडित कुलकर्णी या आरोपींना पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर दोन आरोपींना शोधून ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
(तसेच या प्रकरणात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवण्यासाठी मदत करणारे जरी मुख्य नायक सापडले असले तरी यांची भुमिका साकारण्यासाठी पडद्यामागचे सुचक व अजूनही काही स्थानिक व काही बाहेरील गावचे लोक सहभागी असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी या गुन्ह्याची सखोल चौकशी करून इतर खलनायकांनाही अटक करावी अशी मागणी पंचक्रोशीतील भाविक, भक्त व सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.)
अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमात काही वर्षांपूर्वी भल्यामोठ्या रकमेची चोरी झाल्याबद्दलची माहिती समोर येत असून पंचक्रोशीतील गावागावातून याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन दुसऱ्या भागात जनतेसमोर आणण्यासाठी सत्यजित न्यूज प्रयत्नशील आहे.