साथ प्रतिबंधक कायद्याखाली आशिर्वाद हॉल मालकावर कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२१
कोरोना –१९ साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याने पाचोरा नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या संयुक्तिक कार्यवाहीत शहरातील मंगल कार्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
पाचोरा येथील भडगाव रोड लगत असलेल्या आशीर्वाद हॉल मंगल कार्यालयात म. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार पाचोरा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी पाहणी केली असता सदर मंगल कार्यालयात लग्नविधी समारंभात ५० व्यक्ती पेक्षा जास्त म्हणजेच अंदाजे ४०० ते ५०० जण विना माक्स व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करताना आढळून आले..
जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता पाचोरा नगर परिषदेमार्फत म. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नोटिशीचे पालन न केल्याने व तसेच कोरोना-१९ साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्याने आशीर्वाद हॉल मालकास रुपये दहा हजार व तसेच त्यालगत असलेल्या स्वामी लॉन्स मंगल कार्यालयास विना माक्स बाबत रुपये २००० दंड आकारण्यात आला..
याप्रसंगी खालील अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली..
पोलीस निरीक्षक किसनराव नजन, पोलीस उपनिरीक्षक चौबे ,
पाचोरा नगर परिषदेचे अतिक्रमण अधिकारी साईदास जाधव अभियंता विजेंद्र निकम, आकाश खैरनार, अनिल वाघ,गणेश आहिरे अनिल डागोर पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस नंदकुमार जगताप ,सुनील पाटील, विजयसिंह पाटील, बापू महाजन, मालचे दादा ,योगेश पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.