दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२३

पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या सारोळा गावात आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी सकाळी एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या सारोळा गावातील सौ. भारती रविंद्र मोची अंदाजे वय ३५ वर्ष या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून संबंधित मयत महिलेचा पती हा मागील काही महिन्यांपासून घर सोडून निघून गेला असून संबंधित मयत महिला ही तीची मुलगी कु. अंजली मुले पवन व प्रेम यांच्यासोबत स्वतंत्र घरात रहात असून मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होती. परंतु सौ. भारती मोची हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी संबंधित महिला हिचा पती मागील काही महिन्यांपासून घरी नाही तसेच संबंधित महिला ही आपल्या मुलाबाळांसह स्वतंत्र रहात असतांनाही या महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ का आली याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली झाली पाहिजे अशी मागणी सारोळा गावातील नागरिकांतून दबक्या आवाजात होत आहे.